मोठी बातमी! पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र; पाहा कोणाला किती जागा…

ajit-pawar-sharad-pawar
Share

पुणे : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनी गुप्त बैठका आणि गाठीभेटींनंतर पिंपरी-चिंचवड पाठोपाठ पुण्यातही एकत्रच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतही दोन्ही राष्ट्रवादींनी वेगळ्याच प्रकारचे अंडरस्टँडिग केल्याचे दिसत आहे. आज दुपारी पुण्यात पत्रकार परिषद होणार असून यावेळी दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. पुणे महानगरपालिकेत अजित पवार गट 125 तर शरद पवार गट 40 जागांवर लढेल, असे सांगितले जात आहे.

पिंपरी-चिंचवडमधील सर्व प्रश्न एकत्रितपणे सोडवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी तळवडे येथे केली. याच ठिकाणाहून त्यांनी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडत आगामी निवडणुकीत शहरात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट केले. पिंपरी-चिंचवडनंतर आता पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. काल रात्री उशिरापर्यंत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर यावर एकमत झाले असून आज दुपारी याबाबत अधिकृत पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली जाणार आहे.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येणाऱ्या महापालिका निवडणुकीत अजित पवार गट सुमारे 125 जागा, तर शरद पवार गट 40 जागा लढवणार असल्याचा प्राथमिक फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे. दोन्ही गटांनी एकत्र येऊन पुण्यातील स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी संयुक्तपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये आधीच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची घोषणा झाल्यानंतर पुण्यातही तसाच निर्णय झाल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या समीकरणांवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, बारामतीत गौतम अदानी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमानंतर पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

मोठी बातमी! अजित पवार-शरद पवारांची प्रस्तावित आघाडी तुटली…

अजित पवार भल्या पहाटे एकटेच गेले कुठे? अखेर लोकेशन आलं समोर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *