मोठी बातमी! अजित पवार-शरद पवारांची प्रस्तावित आघाडी तुटली…

ajit-pawar-sharad-pawar
Share

पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये एकत्रित जाणाऱ्या दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडीची चर्चा शुक्रवारी (ता २६) फिस्कटली आहे. अजित पवार यांनी शरद पवारा यांच्या पक्षाला अवघ्या तीस ते पस्तीस जागा देऊ केल्यात आणि घड्याळ या चिन्हावर लढण्याची अट घातली असल्याची माहिती समोर आली आहे.

दोन्ही राष्ट्रवादीची पुणे महापालिकेत आघाडी होणार नाही. आम्ही महाविकास आघाडीतून लढणार असल्याची माहिती अंकुश काकडे यांनी दिली आहे. घडाळ्याच्या चिन्हावर लढण्याचा अजित पवार यांचा प्रस्ताव शरद पवार यांना अमान्य असल्याची माहिती आहे.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या दोन्ही राष्ट्रवादीचे जागावाटप आणि निवडणूक चिन्हावरून मतभेद झाल्याने काल रात्री चर्चा फिस्कटली. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने महाविकास आघाडीच्या साथीनेच लढण्याचा निर्णय घेत काँग्रेस आणि उद्धवसेनेशी चर्चा सुरू केली आहे. पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या दोन्ही पक्षांच्या आघाडीसाठी शरद पवार गटाचे नेते माजी महापौर अंकुश काकडे, माजी स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामती होस्टेलवर शुक्रवारी रात्री भेट घेतली. त्यावेळी जागावाटप आणि घड्याळ की तुतारी चिन्हावर लढायचे, याविषयी चर्चा झाली. शरद पवार गट तुतारी चिन्हासाठी ठाम होता. केवळ ३५ जागा देण्याचा प्रस्तावही शरद पवार गटाला अमान्य होता. त्यामुळे चर्चा फिस्कटली, अशी माहिती समोर आली आहे.

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाशी चर्चा फिस्कटल्यानंतर शरद पवार गटाने तातडीने महाविकास आघाडीच्या घटक पक्षांशी चर्चा सुरू केली आहे. काँग्रेस, उद्धवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या तिन्ही पक्षांची उशिरा रात्री संयुक्त बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) चे विशाल तांबे, अंकुश काकडे, मनाली भिलारे, अश्विनी कदम आणि आमदार बापू पठारे, तर काँग्रेसकडून अरविंद शिंदे, अभय छाजेड, रमेश बागवे आणि ठाकरेंच्या शिवसेनेते वसंत मोरे, गजानन थरकुडे, संजय मोरे हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *