सुप्रिया सुळेंची रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर डोळे पाणावणारी पोस्ट; प्रिय दादा…

ajit-pawar
Share

पुणे: रक्षाबंधनाचा सण आज (शुक्रवार) देशभरात उत्साहात साजरा केला जात आहे. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिवंगत अजित पवार यांच्याबाबत एक भावूक पोस्ट केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे राजकीयदृष्ट्या वेगवेगळ्या गटात गेले. मात्र, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यातील भाऊ-बहिणीचं नातं आणि कौटुंबिक जिव्हाळा हा कायम चर्चेचा विषय राहिला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. बारामती विमानतळावर उतरताना झालेल्या या भीषण अपघातात त्यांच्यासह इतर 5 जणांचाही मृत्यू झाला. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी आज रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर डोळे पाणावणारी पोस्ट केली आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

सुप्रिया सुळेंची अजित पवारांसाठी भावूक करणारी पोस्ट पुढीलप्रमाणे…
आज राखीपौर्णिमा…पण यावेळी तू सोबत नाहीस, ही जाणीव मनाला खूप अस्वस्थ करत आहे. सात महिन्यांपूर्वीची ती भीषण सकाळ आणि तुझं अचानक निघून जाणं…यावर आजही विश्वास बसत नाही. लहानपणापासून एकत्र वाढताना आपली भांडणं, एकमेकांवरचं प्रेम आणि एकमेकांविषयीचा अभिमान हाच आपल्या नात्याचा पाया होता. आजही वाटतं, तू कुठूनतरी अचानक येशील, राखी बांधून घेशील, बहिणींसोबत गप्पागोष्टी करत पुन्हा कुटुंबात रमून जाशील…तुझ्या नसण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणारी नाही. तू जिथे असशील, तिथून तुझं प्रेम आणि आशीर्वाद असेच सदैव पाठीशी राहू दे…असे सुप्रिया सुळे सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *