उद्धव ठाकरे मैदानात! राम मंदिरातील चोरीचा पैसा पक्ष फोडण्यासाठी वापरला जातोय…

uddhav-thackeray
Share

मुंबई: अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरात झालेल्या दान घोटाळ्या प्रकरणी आता शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. राम मंदिरातील दान चोरीविरोधात शिवसेना ठाकरे गटाने राज्यभरात आंदोलनाची हाक दिली आहे. रविवारी, ५ जुलै रोजी दादरमध्ये रामरक्षा आंदोलन होणार असल्याची घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. दादर मधील आंदोलनात उद्धव ठाकरे हे स्वत: सहभागी होणार आहेत.

उद्धव ठाकरे यांनी आज (शुक्रवार) मातोश्री येथे पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, “राम जन्मभूमी आंदोलनाचे भांडवल करून भाजपने अमर्याद सत्ता भोगली. पण आज त्याच राम मंदिरात चोरी झाली आहे. मंदिरात दान म्हणून आलेला पैसा हाच पैसा आता पक्ष फोडण्यासाठी वापरला जातोय अशी चर्चा सुरू आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी अब हिंदू मार नही खायेगा, असे म्हटले होते. आता राम मंदिरातील दान चोरांना ‘हिंदू माफ करणार नाही’ असा थेट आणि घणाघाती हल्ला शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!

‘संपूर्ण देश आज एकाधिकारशाहीखाली (भाजपच्या अंमलाखाली) आहे. राम मंदिरासाठी आणि त्या आंदोलनात शिवसेना व शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मात्र, भाजपने या आंदोलनाचा वापर केवळ सत्तेच्या वाटचालीसाठी केला. आज राम मंदिराचा मुद्दा एका वेगळ्या आणि चुकीच्या कारणाने चर्चिला जात आहे, हे देशाचे दुर्दैव आहे. राम मंदिराच्या कारभारावर आणि तिथल्या कथित गैरव्यवहारावर बोट ठेवत ठाकरे यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. “हे आता ‘ऑपरेशन राम मंदिर’ आहे का असा सवाल त्यांनी केला. राम मंदिरातील चोरीचा पैसा पक्ष फोडण्यासाठी वापरला जातोय, अशी उघड चर्चा आता जनतेत सुरू आहे. मंदिर लुटणाऱ्या या चोरांना हिंदू आता कदापि माफ करणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.

रविवारपासून दादर येथील कबुतरखान्याजवळील हनुमान मंदिरासमोर सर्व हिंदूंनी राजकीय पक्ष बाजूला ठेवून एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. “मी स्वतः रविवारी दादरमध्ये उपस्थित राहून ‘रामरक्षा आंदोलन’ करणार आहे. जे जे बाळासाहेबांच्या विचारांचे आहेत आणि जे स्वतःला खरे हिंदू समजतात, त्यांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. हे आंदोलन केवळ मुंबईपुरते मर्यादित नसून, शहरापासून ते अगदी खेड्यापाड्यापर्यंत आम्ही राम मंदिरातील चोरीच्या विरोधात आंदोलन पेटवणार आहोत,” असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी सर्व रामभक्तांना केले आहे. राम रक्षा आंदोलनात सगळ्या हिंदूंना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये राजकीय पक्षाचे नेते ते सरकारमधील प्रमुख, मंत्री यांनाही हे आवाहन असल्याचे उद्धव यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटले आहे.

राज ठाकरे यांची बेधडक पोस्ट! IPS विश्वास नांगरे पाटील भरकटले; राजीनामा द्या आणि भाजपमध्ये सामील व्हा…

ठाकरेंच्या निष्ठावंत शिलेदाराचे जंगी स्वागत, 100 कोटींची ऑफर येऊनही…

घरी बोलावून त्याला मंत्री केलं ही माझी चूक झाली: उद्धव ठाकरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *