महिला खासदाराकडे सोन्याची ब्रा अन् पँटी, छापेमारीत कोट्यावधीची रक्कम जप्त…

iraq-mp
Share

बगदाद (इराक): इराकी सुरक्षा यंत्रणांनी हिंद अल-अब्बासी (Hind Al-Abbasi) या इराकी महिला खासदाराच्या घरावर टाकलेल्या छाप्यात मोठं घबाड जप्त केले आहे. सोन्यापासून बनवलेले अंतर्वस्त्र (सोन्याची ब्रा आणि पँटी), कोट्यावधी रुपयांची रोकड पोलिसांना मिळाली आहे. सोशल मीडियावर नोटांचे ढीग, सोन्याची बिस्किटे आणि या महागड्या वस्तूंचे फोटो व्हायरल झाले आहेत.

सोशल मीडियावर काही फोटो आणि पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की 57 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (सुमारे 490 कोटी रुपये) रोख रकमेसह 27 किलो सोनं सापडले आहे. इराक सरकारने भ्रष्टाचारी राजकारणी आणि सरकारी अधिकाऱ्यांविरुद्ध एक मोठी मोहीम उघडली आहे. मनी लाँड्रिंग आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अनेक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या घरांवर छापे टाकण्यात आले असून मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम आणि सोने जप्त करण्यात आले आहे, तसेच अनेक जणांना ताब्यातही घेण्यात आले आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!

व्हायरल पोस्टमध्ये ही जप्ती थेट हिंद अल-अब्बासी यांच्या घरातून झाल्याचे म्हटले असले, तरी इराकी प्रशासनाने किंवा अधिकृत यंत्रणांनी याला अद्याप कोणताही दुजोरा दिलेला नाही. व्हायरल होत असलेले सर्व फोटो किंवा जप्त केलेल्या वस्तूंची यादी थेट त्यांच्याशीच संबंधित आहे, असे कोणतेही अधिकृत विधान समोर आलेले नाही. दरम्यान, फॅक्ट-चेकर्स आणि रिपोर्ट्सनुसार, या दाव्याला कोणताही अधिकृत आधार किंवा पुरावा मिळालेला नाही. काही रिपोर्ट्सनुसार, हा दावा अत्यंत अतिशयोक्ती करून पसरवला गेला आहे किंवा त्याचा या प्रकरणाशी संबंध जोडण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *