राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल…

eknath-shinde
Share

ठाणे: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शुक्रवारी (ता. ३) रात्री अचानक प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती शिवसेनेतील सूत्रांकडून देण्यात आली आहे. शिवसेनेतील (शिंदे गट) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंतेचे कोणतेही मोठं कारण नसून, केवळ विश्रांती आणि आवश्यक उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

प्राथमिक माहितीनुसार, विधिमंडळाचे कामकाज सुरू असतानाच शुक्रवारी दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ताप आला होता. अशक्तपणा जाणवत होता. त्यांना ‘व्हायरल फिव्हर’ आणि अशक्तपणाचा त्रास होत असल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर देखरेख ठेवून असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!

प्राथमिक माहितीनुसार, राज्यातील वेगवान राजकीय घडामोडी आणि सततच्या धावपळीमुळे त्यांना विश्रांती मिळाली नव्हती. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचे पुढील नियोजित कार्यक्रम आणि राजकीय दौरे तात्पुरते पुढे ढकलण्यात आले आहेत. काल दुपारी होणारा एका महत्त्वाच्या पक्षप्रवेशाचा सोहळा देखील त्यांच्या प्रकृतीमुळेच रद्द करावा लागला होता. गेल्या काही दिवसांमध्ये कामाचा अतिताण आणि प्रचंड दगदग याचा परिणाम एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीवर झाला आहे. यामुळे शुक्रवारी विधिमंडळाचे कामकाज सुरु असताना एकनाथ शिंदे यांना ताप आला होता. तसेच त्यांना प्रचंड अशक्तपणा जाणवत होता. काल ठाण्यातील गंगुबाई शिंदे सभागृहात दुपारच्या सुमारास धुळ्यातील ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार होता. मात्र, एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याने सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. यानंतर एकनाथ शिंदे हे तातडीने ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. सध्या ते रुग्णालयातच असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही विशेष काळजी करण्याचे कारण नाही, असे शिवसेनेतील सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये शिंदे सेना आणि महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून ठाकरे गटाचे सहा खासदार आणि मुंबईतील विधानपरिषद आमदार सचिन अहिर यांना फोडून आपल्या शिवसेनेत दाखल करुन घेतले होते. यानिमित्ताने एकनाथ शिंदे यांनी अनेकदा दिल्लीच्या वाऱ्या केल्या आहेत. याशिवाय, या राजकीय घडामोडींमुळे एकनाथ शिंदे हे सतत कामात व्यग्र होते. याचाच परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाला असण्याची शक्यता आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळात अडकलं, इमर्जन्सी लँडिंग…

खळबळजनक आरोप! अशोक खरात हा एकनाथ शिंदे अन् रुपाली चाकणकर यांचा गुरु…

मोठी बातमी! ठाकरेंच्या 9 पैकी 8 खासदारांसोबत एकनाथ शिंदे यांची गुप्त बैठक…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *