मोठी बातमी! ठाकरेंच्या 9 पैकी 8 खासदारांसोबत एकनाथ शिंदे यांची गुप्त बैठक…

eknath-shinde
Share

मुंबईः राज्यात ऑपरेशन टायगर राबवून ठाकरे गटाचे खासदार फोडण्यासाठी दिल्लीतील नेतृत्त्वाने एकनाथ शिंदे यांना हिरवा कंदील दिला नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असली तरी शिंदे पडद्यामागे अजूनही यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती समोर आली आहे.

‘ऑपरेशन टायगर’च्या (Operation Tiger) अनुषंगाने ठाण्यात एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्या खासदारांची बुधवारी रात्री गुप्त बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेत मोठी खळबळ माजण्याची शक्यता आहे. तसेच येत्या काही दिवसांमध्ये एकनाथ शिंदे हे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी करुन महाराष्ट्राच्या राजकारणात नवा भूकंप करणार का, ही चर्चा पुन्हा रंगली आहे. उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या खासदारांना मातोश्रीवर बोलावून त्यांच्याशी संवाद साधला होता. त्यावेळी ठाकरे गटाच्या सर्व खासदारांनी आपण पक्षाशी इमानदार राहू, अशा शब्द उद्धव ठाकरे यांना दिला होता. मात्र, आता या नव्या भेटीने ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना पुन्हा उधाण येण्याची शक्यता आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अजित पवार यांच्या आठवणींवर स्मरणग्रंथ होणार प्रकाशित; अनुभव व लेख पाठविण्याचे आवाहन…

सूत्रांच्या माहितीनुसार, बुधवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी अचानक त्यांचा ताफा सोडून वेगळ्या मार्गाने गेली. त्यानंतर ठाण्यातील व्होल्टास कंपनीच्या परिसरात एकनाथ शिंदे हे ठाकरे गटाच्या खासदारांना भेटल्याचे वृत्त आहे. बुधवारी रात्री उशीरा सुरु झालेली ही बैठक पहाटेपर्यंत सुरु होती, अशी माहिती आहे. या बैठकीला एकनाथ शिंदे यांच्यासोबत श्रीकांत शिंदे हेदेखील उपस्थित असल्याची माहिती आहे.

तर ठाकरे गटाकडून या बैठकीला खासदार अरविंद सावंत, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे, राजाभाऊ वाजे हे उपस्थित होते. तर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह दोन खासदार व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत या खासदारांना शिंदे गटात सहभागी होण्याची ऑफर दिली गेल्याची माहिती आहे. मात्र, ठाकरेंच्या खासदारांना संपर्क केल्यानंतर ओमराजे निंबाळकर आणि अरविंद सावंत दोघांनाही अशी कोणतीही बैठक झाल्याचे वृत्त फेटाळून लावले. दरम्यान, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी फोन केला तर मदत करणार का? एकनाथ शिंदेंचं बेधडक उत्तर…

अजितदादांच्या विमान अपघातानंतर एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय…

एकनाथ शिंदेंनी डाव टाकला! विरोधकांना जबर धक्का, शिंदेंच्या शिवसेनेत नेत्यांची मोठी एंट्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *