मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी फोन केला तर मदत करणार का? एकनाथ शिंदेंचं बेधडक उत्तर…

eknath-shinde
Share

नवी दिल्ली: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (मंगळवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी यांच्यात जवळपास दोन तास चर्चा झाली. नरेंद्र मोदींसोबतच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना विधान परिषदेचे आमदार व्हायचे असेल तर एकनाथ शिंदेंना फोन करा…एकनाथ शिंदे हे मोठ्या मनाचे नेते आहेत, असे विधान केले होते. नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांना नरेश म्हस्केंच्या याच विधानावर पत्रकारांनी प्रश्न विचारला. उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेसाठी फोन केला तर मदत करणार का?, असं पत्रकारांनी प्रश्न विचारताच राज्यसभेची निवडणूक झाली. आता विधानपरिषदेची निवडणूक येईल, तेव्हा बघू, असे एकनाथ शिंदेंनी हसतहसत उत्तर दिले.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

प्रत्येक अधिवेशनात मी खासदारांना भेटण्यासाठी दिल्लीत येत असतो. काल आमच्या खासदारांना भेटलो. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना भेटलो. ही सदिच्छा भेट होती. कोण टीका करतंय, कोण काय बोलतंय, यापेक्षा मला काय करायचं ते मी करत असतो. विरोधक नेहमी त्यांचं टीका करण्याचं काम करत असतात. मी टीकेला कामाने उत्तर देत असतो, असे एकनाथ शिंदे म्हणाले. इराण-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभुमीवर देशातील सगळ्या पक्षांनी एकसंघ राहिले पाहिजे, हे मी नरेंद्र मोदींसोबत बोललो. शिवसेना त्यांच्यासोबत आहे, हेही त्यांना सांगितले, अशी माहिती एकनाथ शिंदेंनी माध्यमांशी बोलताना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *