मुंबईः भारताचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत त्यांना असं का वाटलं की जे लोक सिस्टम विरुद्ध बोलतात ते कॉकरोच आणि पॅरासाईट (परजीवी) आहेत? चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांचा रोल लोकशाहीमध्ये संविधानाचे रक्षण करणे आणि लोकांच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करणे हा आहे. त्यातलाच एक अधिकार हा ‘फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन’ म्हणजेच बोलण्याचा अधिकार आहे. ज्यांचे काम या अधिकाराची संरक्षण करणे आहे, तेच जर बोलणाऱ्यांना कॉकरोच आणि पॅरासाईट म्हणत असतील, तर हे खूपच ‘सॅड स्टेटमेंट’ होतं. म्हणूनच आम्ही ही ‘कॉकरोच जनता पार्टी’ सुरू केली आहे, कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दीपके यांनी सांगितले.
अभिजित दीपके म्हणाले, सुप्रीम कोर्टाचे जे जजेस असतात, त्यांना रिटायरमेंटनंतर सरकारकडून एखाद्या कमिटीचे चेअरमन बनवले जाते किंवा राज्यसभेत पाठवले जाते. याच्यामुळे जजेसच्या काय अपेक्षा सेट होत आहेत की मला रिटायरमेंटनंतर काहीतरी भेटेल, त्यामुळे मी सरकारसोबत गुड टर्म्सवर असलं पाहिजे. माझा रोष एकंदरीत पूर्ण सिस्टमसाठी आहे. आज भाजप सत्तेत आहे, उद्या दुसरा कोणता पक्ष असेल. जे कोणी पक्ष या देशाच्या इन्स्टिट्यूशन्सची क्रेडिबिलिटी नीट ठेवणार नाहीत, तर मग लोकशाही कशाची राहिली? आपल्याकडे सध्या उलटी डेमॉक्रसी चालू आहे. मतदार सरकार निवडण्याऐवजी, सरकार ठरवतंय की मतदान कोण, अशा शब्दात कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दीपकेनं आपल्या भावना व्यक्त केल्या.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!
आमचे अकाउंट हॅक करायचे प्रयत्न चालू आहेत कारण आमची पॉप्युलॅरिटी त्यांच्यापेक्षा जास्त वाढली आहे. जर ते हॅक नाही करू शकले तर ते अकाउंट बॅन करून टाकतील. आयबी (IB) आणि बाकी एजन्सीज आमच्यावर नजर ठेवून आहेत. तुम्ही आमचे अकाउंट बंद कराल, पण युवकांच्या मनामध्ये जो राग आहे तो तुम्ही हॅक करू शकता का? तो राग तुम्ही बॅन करू शकता का? अशी विचारणा अभिजितने केली.
राजकीय पक्षात रुपांतर होणार का? यावर बोलताना अभिजित म्हणाले, ‘नक्कीच होईल, पण आता काही सांगणं थोडं अवघड असेल. कारण ही पार्टी आम्ही काही प्लॅनिंग करून सुरू केली नव्हती. जर चीफ जस्टिस ऑफ इंडियांचे ते विधान आले नसते, तर मी आज इथे इंटरव्ह्यूला बसलो नसतो. अवघ्या 3-4 दिवसात 1 कोटी 10 लाख लोक इन्स्टाग्रामवर जोडले गेले आहेत. इतक्या लोकांशी बोलून प्लॅनिंग करणे सध्या अवघड आहे. आम्ही आधी या लोकांशी बोलू, त्यांच्याकडून इनपुट्स घेऊ की त्यांचा सध्याच्या सिस्टिमवर आणि सरकारवर एवढा राग का आहे? लोकांची तक्रारच ही आहे की कुठलेच सरकार किंवा पक्ष त्यांचे ऐकून घ्यायला तयार नाही. मला ती चूक करायची नाही, म्हणून आधी त्यांना समजून घेऊन मगच आम्ही पुढचे पाऊल ठरवू.’
View this post on Instagram
पक्षाच्या सदस्यत्वासाठी चार पात्रता
पहिली: बेरोजगारी
दुसरे: आळशी असणे म्हणजे निष्क्रिय राहणे
तिसरे: ऑनलाइन राहण्याचे व्यसन
चौथे: व्यावसायिक राग व्यक्त करण्याची क्षमता
जाहीरनामा प्रसिद्ध, 5 आश्वासने
जर सीजेपी (झुरळ जनता पार्टी) सत्तेवर आली, तर कोणत्याही सरन्यायाधीशांना निवृत्तीनंतर राज्यसभेची जागा बक्षीस म्हणून दिली जाणार नाही.
जर कोणतेही वैध मत रद्द केले गेले, तर मुख्य निवडणूक आयुक्तांना यूएपीए (UAPA) अंतर्गत अटक केली जाईल, कारण कोणाचा मतदानाचा हक्क काढून घेणे हे दहशतवादापेक्षा कमी नाही.
महिलांसाठी 33 नव्हे, तर 50 टक्के आरक्षण असेल. यासाठी खासदारांची संख्या वाढवली जाणार नाही. मंत्रिमंडळातही महिलांसाठी 50 टक्के आरक्षण असेल.
खऱ्या अर्थाने स्वतंत्र माध्यमांना भरभराटीस येण्याची संधी देण्यासाठी अंबानी आणि अदानी यांच्या मालकीच्या सर्व माध्यम संस्थांचे परवाने रद्द केले जातील. लाळघोटू मीडिया अँकर्सच्या बँक खात्यांची चौकशी केली जाईल.
जर कोणताही आमदार किंवा खासदार दुसऱ्या पक्षात गेला, तर त्यांना निवडणूक लढवण्यास बंदी घातली जाईल. त्यांना पुढील 20 वर्षांसाठी कोणतेही सार्वजनिक पद धारण करण्यास बंदी घालण्यात येईल.
अभिजीतने केले ‘आप’साठी काम…
अभिजीत अमेरिकेतील बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये पब्लिक रिलेशन्समध्ये पदव्युत्तर पदवी घेत आहे. त्याने 2020 ते 2023 पर्यंत आम आदमी पार्टीच्या (आप) सोशल मीडिया टीममध्ये स्वयंसेवक म्हणूनही काम केले. त्याने बीबीसीला सांगितले, “मी सरन्यायाधीशांचे X विषयावरील वक्तव्य पाहत होतो, ज्यात त्यांनी व्यवस्थेवर टीका करणाऱ्या आणि आपली मते व्यक्त करणाऱ्या देशातील तरुणांची तुलना झुरळे आणि परजीवींशी केली होती. मी यावर सोशल मीडियावर माझे मत व्यक्त केले. मी विचारले की जर सर्व झुरळे एकत्र आली तर काय होईल. मला ‘जनरेशन झेड’ आणि 25 वर्षांपर्यंतच्या तरुणांकडून अप्रतिम प्रतिसाद मिळाला. ते म्हणाले की आपण एकत्र येऊन एक व्यासपीठ तयार केले पाहिजे. मग मी ‘सीजेपी’ची (CJP) निर्मिती केली.”
सरन्यायाधीशांनी ‘झुरळ’ वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले…
दरम्यान, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी शनिवारी त्यांच्या ‘परजीवी’ आणि ‘झुरळ’ या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, “माझे वक्तव्य विशेषतः अशा लोकांसाठी होते, जे बनावट आणि खोट्या पदव्यांच्या आधारे कायद्यासारख्या व्यवसायात शिरले आहेत. अशा लोकांनी प्रसारमाध्यमे, सोशल मीडिया आणि इतर प्रतिष्ठित व्यवसायांमध्येही शिरकाव केला आहे. ते परजीवींसारखे आहेत.” एका खटल्याची सुनावणी करताना सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातील बेरोजगार तरुणांना झुरळे म्हटले होते. ते म्हणाले, “काही बेरोजगार तरुण हे झुरळांसारखे असतात, जे नंतर प्रसारमाध्यमे, सोशल मीडिया किंवा आरटीआय कार्यकर्ते बनतात आणि व्यवस्थेवर हल्ला करू लागतात.”
महाराष्ट्रातील मुलाने सुरु केली कॉक्रोच जनता पार्टी; फॉलोअर्सच्या संख्येत भाजपलाही टाकलं मागे…