पुणे : एका उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पाच हजार रुपयांची चिल्लर दिली. संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, पुणे तिथे काय उणे असे म्हटले जात आहे.
पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 26 (ड) घोरपडी पेठ–गुरुवार पेठ–समताभूमी येथून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेल्या गणेश किरण खानापुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना लक्ष वेधून घेतले. उमेदवारी अर्जासाठी आवश्यक असलेली अमानत रक्कम त्यांनी थेट चिल्लर नाण्यांमधून भरली.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
गणेश खानापुरे मोठ्या पिशव्यांमध्ये चिल्लर घेऊन निवडणूक कार्यालयात दाखल झाले. नियमांनुसार अमानत रक्कम स्वीकारणे बंधनकारक असल्याने अधिकाऱ्यांना ती रक्कम मोजावी लागली. मात्र नाण्यांची संख्या इतकी मोठी होती की ती मोजताना निवडणूक कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ आले. बराच वेळ या प्रक्रियेत गेला. या प्रकारामुळे कार्यालयातील कामकाज काही काळ खोळंबले होते. तथापि, सर्व नाणी मोजून अमानत रक्कम पूर्ण असल्याची खात्री झाल्यानंतर खानापुरे यांचा उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आला. या अनोख्या प्रकारामुळे उपस्थित नागरिक, कर्मचारी आणि इतर उमेदवारांमध्येही उत्सुकता निर्माण झाली होती.
गणेश खानापुरे म्हणाले, सामान्य माणसाकडे रोजच्या व्यवहारातून जमा झालेली चिल्लरच अधिक असते. निवडणूक प्रक्रियेत सामान्य नागरिकांचे प्रतिनिधित्व व्हावे, हा संदेश देण्यासाठीच मी अमानत रक्कम नाण्यांमधून भरली. नागरिकांनी त्यांना जमेल तसे पैसे दिले तेच आज मी भरले आहे. सामान्य जनता माझ्या पाठीशी आहे त्यामुळे मी ही निवडणूक मी जिंकणार आहे.’