चर्चांना उधाण! अजित पवार घेणार मोठा निर्णय? राजकीय हालचालींना वेग…

ajit-pawar-sharad-pawar
Share

बारामती : पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगर पालिकेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सगळी ताकद पणाला लावली होती. यासाठी त्यांनी शरद पवार गटासोबत देखील युती केली होती. पण या दोन्ही महानगर पालिकेत अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. महापालिकेचा हा निकाल अजित पवार यांच्या जिव्हारी लागल्याचे दिसत असून, ते मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती पुढे आली आहे.

राज्यातील २९ महानगर पालिकांचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. २९ पैकी २१ महानगर पालिकांवर भाजपसह महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. काँग्रेस हा राज्यातील दुसरा सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेसने तीन महापालिकांवर मित्रपक्षांच्या मदतीने विजय खेचून आणला आहे. पण या निवडणुकीत अजित पवार गटाला एकाही महापालिकेवर एकहाती विजय मिळवता आला नाही. महापालिकेचा निकाल अजित पवार यांच्या जिव्हारी लागल्याचे दिसून आले आहे.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

निकालाच्या दिवशी अजित पवार प्रसारमाध्यमांपासून दूर राहिले. काही पत्रकारांनी त्यांनी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. पण ते कुणालाही उत्तर न देता निघून गेले. त्यांचा चेहरा पडला होता. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील पराभव त्यांच्या जिव्हारी लागल्याचं स्पष्टपणे दिसून येत होता. महापालिकेच्या निकालानंतर अजित पवार यांनी राजकीय हालचालींना वेग दिला आहे.

बारामती येथील गोविंद बागेत अजित पवार हे शरद पवार यांची भेट घेणार आहेत. अजित पवारांसोबत शरद पवार गटाचे माजी आमदार राजेश टोपे देखील आहेत. महापालिका निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अजित पवार तडाफडकी शरद पवारांच्या भेटीला दाखल झाले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राज्यात अजित पवार मोठा निर्णय घेऊ शकतात, असेही बोलले जात आहे.

दुसरीकडे, महापालिकेतील पराभवानंतर जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने ही भेट महत्त्वाची असल्याचं बोललं जात आहे. यासाठीच ते शरद पवार यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेल्याचे देखील सांगितले जात आहे. सध्या पवार काका पुतण्यांच्या भेटीचं कारण गुलदस्त्यात आहे. मात्र महापालिकेतील पराभवानंतर अजित पवार अशाप्रकारे शरद पवार यांच्या भेटीसाठी गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून चर्चांना उधाण आले आहे.

पुण्यात काका-पुतण्याला एकी करुनही मोठा झटका…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *