भाजपच्या माजी आमदाराला लाठी-काठ्यांनी बेदम मारहाण करून संपवलं…

bjp-ex-mla-atar-singh-bhadana
Share

जयपूर (राजस्थान): एका वादातून भाजपच्या माजी आमदाराचा जमावाकडून झालेल्या मारहाणीत मृत्यू झाला आहे. भाजपचे माजी आमदार आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांवर जवळपास ७०-८० जणांच्या जमावाने लाठी-काठीने हल्ला केला. त्यानंतर रुग्णालयात उपचार सुरू असताना माजी आमदाराचा मृत्यू झाला.

राजस्थानच्या भरतपुर जिल्ह्यात खाणीच्या क्रॅशर प्लांटवरून सुरू असलेला वाद रविवारी संध्याकाळी रक्तरंजित वादात उलटला. बयानाचे माजी आमदार आणि भाजप नेते अतर सिंह भडाना यांच्यावर लाठी-काठ्यांनी हल्ला करण्यात आला. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. वैर पोलीस ठाणे हद्दीतील भोंडा गावात क्रेशर प्लांटवर उपस्थित असलेले माजी आमदार भडाना आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर ७० ते ८० जणांच्या जमावाने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या भडाना यांनी जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात रात्री साडेअकराच्या सुमारास मृत्यू झाला. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

अतर सिंह भडाना भोंडा गावातील त्यांच्या क्रेशर प्लांटवर रविवारी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास उपस्थित होते. याच दरम्यान ग्रामस्थ आणि भडाना यांच्या समर्थनात असलेल्या लोकांमध्ये वाद वाढला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यावेळी मोठ्या संख्येने आलेल्या लोकांनी लाठी-काठ्या व दगडांनी हल्ला केला. या संघर्षात अतर सिंह भडाना आणि त्यांचा सहकारी गगन शर्मा गंभीर जखमी झाले. दोघांनाही प्रथम वैर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने भडाना यांना जयपूर आणि गगन शर्मा यांना भरतपुर येथे दाखल करण्यात आले. जयपूरमधील एसएमएस रुग्णालयात उपचार सुरू असताना भडाना यांचा मृत्यू झाला.

भाजपच्या बड्या खासदाराचा पक्षाला रामराम; राजकीय वर्तुळात खळबळ…

Video Viral! भाजप मंत्र्यांची भर कार्यक्रमात नगरसेविकेवर बोलताना जीभ घसरली…

भाजपचे माजी आमदार अन् बडतर्फ पोलिसाच्या विरोधात गुन्हा दाखल; युवतीवर अत्याचार…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!