लखनौ (उत्तर प्रदेश): मेरठमध्ये भाजप नेत्याच्या मुलाने विषारी पदार्थ प्राशन करून आपलं जीवन संपवलं. विशेष म्हणजे, लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच त्याने हे टोकाचं पाऊल उचलले आहे. प्रवल गुप्ता (वय २६) असे मृत युवकाचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी त्याने एक व्हिडिओ रेकॉर्ड केला असून, त्यामध्ये त्याने आपली पत्नी स्नेहा गुप्ता आणि तिच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. त्याने त्यांच्यावर शारीरिक मारहाण, मानसिक छळ आणि मालमत्ता तिच्या नावावर करण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला आहे.
प्रवल गुप्ता भाजपच्या कांकरखेडा मंडळाचे उपाध्यक्ष राजीव गुप्ता यांचा मुलगा आहे. प्रवल गुप्ता आणि स्नेहा गुप्ता यांचे लग्न गेल्या वर्षी २ नोव्हेंबर रोजी झाले आहे. आत्महत्येपूर्वी तयार केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, “मी आज माझे आयुष्य संपवत आहे. या टोकाच्या निर्णयामागे माझी पत्नी स्नेहा गुप्ता आणि तिचे कुटुंबीय जबाबदार आहेत.’
View this post on Instagram
प्रवलने आरोप केला की, त्याची पत्नी त्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना मारहाण करत असे, तसेच मालमत्ता तिच्या नावावर करण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकत आहे. ती मुद्दाम त्याला जळलेल्या चपाती खायला देत असे आणि जेव्हा तो याबद्दल तक्रार करायचा, तेव्हा ती त्याच्याशी भांडण करत असे. याव्यतिरिक्त, तिने त्याला वारंवार आपल्या पालकांचे घर सोडून तिच्यासोबत स्वतंत्र राहण्यासाठी दबाव टाकल्याचा दावाही त्याने केला आहे. काही काळानंतर आपल्या कुटुंबापासून वेगळा होऊन पत्नीसोबत स्वतंत्रपणे राहू लागला होता. मात्र, त्यांच्या मुलीच्या जन्मानंतर त्याला पुन्हा आपल्या आई-वडिलांकडे परत जायचे होते. स्नेहाने या निर्णयाला विरोध केला, भांडण करू लागली.
नवजात मुलीची काळजी घेण्यासाठी आपल्या आईला बोलावले, तेव्हा पत्नीने त्याच्या आईला मारहाण केली. गाझियाबादमधील एका खासगी कंपनीत काम करणारा प्रणव, आपला संपूर्ण पगार पत्नीच्या हातात देत होता. एवढे असूनही ती त्याच्या आई-वडिलांशी गैरवर्तन करत असे. जेव्हा त्याची बहीण त्यांच्या घरी आली, तेव्हा स्नेहाने तिच्याशीही गैरवर्तन केले आणि तिच्या चारित्र्यावर संशय घेतला. तिचे वडील राजन गुप्ता यांच्या प्रभावाखाली येऊन, पत्नी त्याला खोट्या आरोपांत अडकवण्याची धमकी देत होती. त्याने दावा केला की, त्याच्या सासरच्या मंडळींनी वारंवार त्याला बनावट आरोपांत अडकवण्याची धमकी दिली होती.
पालकांची सुनेवर कारवाईची मागणी…
प्रवलच्या निधनाने त्याचे आई-वडील पूर्णपणे कोलमडून गेले आहेत. त्याचे वडील, राजीव गुप्ता यांनी सांगितले की, बरोबर एका वर्षापूर्वी याच तारखेला त्यांनी आपल्या मुलाची वरात काढली होती. प्रवलची आई, किरण गुप्ता यांनीही आपल्या सुनेवर आरोप केला की, तिने प्रवलवर वारंवार दबाव आणला होता की त्याने आपल्या आई-वडिलांपासून वेगळे राहावे. त्यांनी असा दावा केला की, जेव्हा प्रवलने आपल्या पत्नीला परत येण्यासाठी समजावण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिने नकार दिला आणि उलट त्याला ‘जा आणि मरून जा’ असे म्हटल्याचा आरोप आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी शिव ठाकूर यांनी सांगितले की, “या प्रकरणाच्या सर्व पैलूंचा तपास केला जात आहे. लवकरच या प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.”
भाजपच्या माजी आमदाराला लाठी-काठ्यांनी बेदम मारहाण करून संपवलं…
Video Viral! भाजप मंत्र्यांची भर कार्यक्रमात नगरसेविकेवर बोलताना जीभ घसरली…
भाजपचे माजी आमदार अन् बडतर्फ पोलिसाच्या विरोधात गुन्हा दाखल; युवतीवर अत्याचार…
भाजप नेत्याच्या सुनेची आत्महत्या; नवऱ्याचे अनैतिक संबंध अन् अंतर्वस्त्रातील चिठ्ठी…