पुणे: पुणे महानगर पालिकेसाठी अजित पवार यांनी शरद पवार गटाला साद घातली आहे. ही निवडणूक एकत्र लढण्याच्या दिशेनं दोन्ही पक्षाचे नेते चर्चा करत आहेत. पण अजित पवारांच्या या खेळीमुळे महाविकास आघाडीत वादाचा भडका उडाला आहे. अजित पवार गटासह शरद पवार गट आणि काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येताना दिसत आहे.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची माहिती समोर येताच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिला आहे. पवार गटातील अनेक नेत्यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते राजीनाम्यावर ठाम राहिले. आता ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. मात्र प्रशांत जगताप यांना काँग्रेसमध्ये घेण्यास स्थानिक काँग्रेस नेत्यांनी विरोध केला आहे. प्रशांत जगताप यांना काँग्रेसमध्ये घेतल्यास आम्ही भाजपात जाऊ अशी भूमिका काँग्रेस नेते दत्ता बहिरट, अभिजीत शिवरकर आणि आणखी एका माजी नगरसेवकाने घेतली आहे. काँग्रेस नेत्यांचा हा पवित्रा पाहता आता प्रशांत जगताप यांना काँग्रेसमध्ये प्रवेश मिळणार का? याबाबत अनेकांना पडलेला प्रश्न आहे.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
महायुतीत सन्मानपूर्ण जागा मिळाव्यात, यासाठी दबाव तंत्र म्हणून अजित पवार यांनी शरद पवार गटासोबत जाण्याची खेळी केली होती. पण हा खेळ शरद पवार गटासह काँग्रेसमध्ये भडका उडवारा ठरत आहे. कारण दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्यास काँग्रेस पक्षही तयार नाही. काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने अजित पवार यांना रेड सिग्नल दाखवल्याची देखील चर्चा आहे. एकूणच अजित पवार यांनी शरद पवारांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याने पुण्याचे राजकारण ढवळून निघाले असून, राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.