मेरठ (उत्तर प्रदेश): देशातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला (BJP) उत्तर प्रदेशात मोठा धक्का बसला आहे. भाजपकडून दोन टर्म खासदारने पक्षाला राम राम केला आहे. टाटा..बाय-बाय…अशी पोस्ट लिहित भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे.
बरेली जिल्ह्यातील आवला मतदारसंघातून दोन वेळा खासदार राहिलेले धर्मेंद्र कश्यप यांनी पक्षाच्या प्राथमिक आणि सक्रिय सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. पक्षासाठी राबणाऱ्या मागास आणि अतिमागास समाजातील कार्यकर्त्यांचा अनादर होत असल्याचा आणि लोकसभा निवडणुकीत पक्षाविरोधात काम करणाऱ्यांना बक्षीस दिले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
View this post on Instagram
भाजपकडून राज्यसभेच्या उमेदवारांची घोषणा होताच कश्यप यांनी पक्षाला राम राम करत सोशल मीडियावर “टाटा बाय-बाय” अशी पोस्ट लिहून आपल्या निर्णयाची माहिती दिली. त्यांनी आपला राजीनामा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष, ब्रिज प्रदेशाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांना उद्देशून पाठवला आहे.
धर्मेंद्र कश्यप यांनी आपल्या पत्रात कोणाचेही थेट नाव घेतले नसले, तरी भाजपकडून श्रुती गंगवार यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. कश्यप स्वतः राज्यसभेच्या तिकिटासाठी उत्सुक होते आणि त्यांच्याऐवजी दुसऱ्या नावाची घोषणा झाल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मागास घटकांना पक्षात योग्य प्रतिनिधित्व आणि सन्मान दिला जात नसल्याची खंत व्यक्त करत त्यांनी पक्षातील अंतर्गत कारभारावर उघडपणे प्रश्न उपस्थित केले आहेत.
दरम्यान, धर्मेंद्र कश्यप यांचा राजीनामा पक्षाने स्वीकारला आहे की त्यांची नाराजी दूर करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केले जातील, याबाबत भाजपकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. परंतु, ऐन निवडणुकीच्या तोंडावर एका ज्येष्ठ नेत्याने सोडलेली साथ भाजपसाठी मोठा डोकेदुखी ठरू शकते.
Video Viral! भाजप मंत्र्यांची भर कार्यक्रमात नगरसेविकेवर बोलताना जीभ घसरली…
भाजपचे माजी आमदार अन् बडतर्फ पोलिसाच्या विरोधात गुन्हा दाखल; युवतीवर अत्याचार…
भाजपच्या महिला आमदाराबद्दल बोलताना शिंदेंच्या आमदाराची घसरली जीभ…
भाजप नेत्याच्या सुनेची आत्महत्या; नवऱ्याचे अनैतिक संबंध अन् अंतर्वस्त्रातील चिठ्ठी…
One thought on “भाजपच्या बड्या खासदाराचा पक्षाला रामराम; राजकीय वर्तुळात खळबळ…”