पुणेकरांच्या खिशाला कात्री! CNGच्या दरात मोठी वाढ; पाहा नवीन दर…

petrol
Share

पुणे: जागतिक बाजारपेठेतील घडामोडी आणि गॅस टंचाईचे सावट यामुळे पुणे शहर आणि परिसरात ‘कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस’च्या (CNG) किमतीत वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ शुक्रवारी (ता. ८) मध्यरात्रीपासून लागू करण्यात आली आहे.

नव्या दरांबाबतचे अधिकृत प्रसिद्धीपत्रक ‘एमएनजीएल’कडून जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो १ रुपया ५० पैशांची वाढ जाहीर केली आहे. या दरवाढीमुळे रिक्षाचालक आणि खासगी वाहनचालकांना आता आर्थिक फटका बसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. गॅस टंचाईचे हे काळे ढग निवळत असल्याचे वाटत असतानाच अचानक करण्यात आलेल्या या दरवाढीने वाहनचालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. या दरवाढीचा थेट परिणाम वाहतूक खर्चावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!

एमएनजीएलने दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात आता सीएनजीसाठी वाहनचालकांना प्रति किलो ९२ रुपये २५ पैसे मोजावे लागणार आहेत. ही दरवाढ शुक्रवारी मध्यरात्रीपासून लागू करण्यात आली आहे. यापूर्वी सीएनजीचे दर ९० रुपये ७५ पैसे प्रति किलो इतके होते. नव्या दरांबाबतचे अधिकृत प्रसिद्धीपत्रक ‘एमएनजीएल’कडून जाहीर करण्यात आले आहे.

दरम्यान, वाढत्या इंधन दरामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडत असताना, पर्यावरणपूरक इंधन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सीएनजीच्या किमतीत झालेली ही वाढ सर्वसामान्यांसाठी अडचणीची ठरणार आहे.

महागाईचा झटका! CNG महागला, घरगुती गॅसचं काय? पाहा नवीन दर…

महागाईचा भडका! व्यावसायिकसह घरगुती सिलेंडरच्या किंमतीमध्ये झाली मोठी वाढ…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *