मुंबई: मुंबई आणि महानगर क्षेत्रातील CNG-PNG वितरण कंपनी असलेल्या महानगर गॅस लिमिटेडने आजपासून सीएनजीच्या दरात वाढ केली आहे. महानगर गॅस लिमिटेडने (MGL) सीएनजीच्या (CNG) दरात प्रति किलो १ रुपयाची वाढ केली आहे. या दर वाढीनंतर आता मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि आसपासच्या परिसरात सीएनजीचा दर ८२ रुपये प्रति किलो झाला आहे. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने रिक्षा, टॅक्सी आणि खासगी वाहनधारकांचे बजेट कोलमडणार आहे.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
अजित पवार यांच्या आठवणींवर स्मरणग्रंथ होणार प्रकाशित; अनुभव व लेख पाठविण्याचे आवाहन…
CNG महागला असला तरी, पाइपद्वारे पुरवठा केल्या जाणाऱ्या घरगुती गॅसच्या (PNG) दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पीएनजीचा दर ५० रुपये प्रति युनिटवर स्थिर असल्याने एमएमआर क्षेत्रातील ३१ लाख कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. एलपीजी सिलिंडरच्या टंचाईची समस्या निर्माण झाल्यानंतर अनेक ग्राहकांचा कल आता पीएनजी गॅसकडे वाढला आहे. इराण-अमेरिका युद्ध स्थितीमुळे नैसर्गिक वायूच्या दरावर परिणाम झाल्याचा अंदाज याआधीच वर्तवण्यात आला होता.
महानगर गॅस लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जागतिक पातळीवरील भू-राजकीय तणाव, देशांतर्गत गॅस वाटपात झालेली कपात आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे गॅस खरेदीचा खर्च वाढला आहे. परिणामी, ही एक रुपयाची वाढ करणे भाग पडले आहे. मात्र, तरीही पेट्रोलच्या तुलनेत सीएनजी अजूनही ४६ टक्के स्वस्त असल्याचे एमजीएलने स्पष्ट केले आहे. या दरवाढीमुळे रिक्षा आणि टॅक्सी चालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.