विनायक राऊत यांच्या सूनेचे हादरवणारे आरोप; हनीमूनचा कंटाळा अन् मासिक पाळी…

vinayak-raut
Share

मुंबईः ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत, त्यांचा मुलगा आणि मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवक गितेश राऊत यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत यांनी दिलेल्या तक्रारीवरून ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यामध्ये कौटुंबिक छळासोबतच ‘जादूटोणा विरोधी कायद्यान्वये’ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजी खासदार विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत राऊत कुटुंबावर अत्यंत खळबळजनक आणि गंभीर आरोप केले आहेत. विनायक राऊत कुटुंबाकडून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. इतकेच नव्हे तर घरात बळजबरीने गोमूत्र प्यायला दिले गेले. माझी सासू ही माझा नवरा घरी असताना व तो घरी नसल्यास पूर्णतः वेगळी वागायची. प्रत्येक गोष्टीत मला टोमणे मारुन, माझ्या घरच्या बद्दल घालून पाडून बोलून मला मानसिक त्रास यायची. आमच्या नात्यात दुरावा येण्यासाठी व आमच्यात क्लेश होण्यासाठी तिचा मोठा सहभाग आहे. माझा पती हा मला मासिक पाळी कधी येईल त्याबाबत सर्व माहिती त्याच्या फोनवर नोंद करून ठेवत होता व माझी पुढची मासिक पाळी अमुक तारखेला येईल, असा विकृतपणे वागत होता. तसेच N.C.R.B (एन.सी.आर.बी) त्याचेवडील, विनायक राऊत, हे खासदार असल्याने त्यांचे कोणते न कोणते कार्यक्रम सतत चालू होते. त्यावेळी सदर कार्यक्रमाला अडचण नको म्हणून माझी सासू, शामल राऊत व गितेश राऊत हे मला मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेण्यास भरीस पाडत होते. त्यामुळे माझी मासिक पाळी दर महिन्याला लांबून मला त्रास होत होता, असे गिरीजा राऊत यांनी पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!

‘लग्नानंतर देवदर्शनाचा कार्यक्रम झाल्यानंतर मी व गितेश राऊत हनीमूनसाठी ऊटी येथे गेलो होतो. ऊटी येथे एकूण 6 दिवस राहिलो असता गितेश माझ्या सोबत शारीरिक संबंध न ठेवता माझ्यापासून दूर राहिला होता. त्याबाबत मी त्याला विचारले की तू असा का वागत आहेस, तुझा काही प्रॉब्लेम आहे का? त्यावेळी त्याने मला मेंटल कनेक्ट होणे गरजेचे आहे. शारीरिक संबंध लग्नात अजिबात महत्वाचे नाहीत, मला हनीमूनचा कंटाळा येतो असे सर्व बोलून मला टाळू लागला. ऊटीवरून मुंबईला आल्यानंतर गावी होणा-या आमच्या लग्नाच्या स्वागत समारंभासाठी आम्ही मुळगावी – तळगाव, मालवण येथे जाण्यास निघालो. त्यावेळी आम्ही पालीच्या गणपती मंदिरात दर्शनासाठी थांबले. त्यावेळी गितेश हा गाडीतून उतरून पुढे चालू लागला. मी साडी घातल्याने व अंगावर दागिने असल्याने मला चालण्यास उशीर होऊ लागल्याने त्याने मला सदर ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांसमोर तुला कुठे घेऊन जायची तुझी लायकी नाही असे सर्व बोलून गलीच्छ भाषेत अपमानित केले होते. प्रत्येक वेळेस गितेशने कधीही भांडण सुरु केल्यास आजूबाजूचा परिसर, भाषा, वेळ-काळ, माझ्या भावना ह्याचा कसलाही विचार न करता त्याचं मनशांत होईपर्यंत माझ्याशी वाद घातले आहेत,’ असे धक्कादायक आरोप गिरीजा राऊत यांनी केले आहेत.

अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!

सन 2018 मध्ये मी व गितेश राऊत तसेच त्यांचा मित्र महेक नंदू व त्याची पत्नी प्रियांका नंदू असे ऑस्ट्रेलिया येथे फिरण्यास गेलो होतो. त्यावेळी सुद्धा गितेश राऊत हा माझ्या जवळ आला नाही आणि मी त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करता त्याने मला शिवीगाळ करीत जबर मारहाण केली होती. त्यावेळी आमच्यात शारीरिक संबंधांवरून वाद झाले. तू मला हाथ लावशील तर विधवा होशील, अशी धमकी देऊन, मला मारून, ते माझ्याशी खूप भांडले. सदर वेळी त्यांनी मला उपाशी ठेवून आणि मला वाईट वागणूक देऊन प्रचंड छळ केला. शारीरिक संबंधांवर माझ्या पतीचे असे मत होते की, तो फक्त इंटरनॅशनल लोकेशन्सलाच जाऊन सेक्स करू शकतो, भारतात सेक्स करायला तो comfortable नाही. शारीरिक जवळीक साधल्यास मला दूर लोटत तो मला सांगायचा की मी नाजूक मुलगा आहे, तुला अक्कल आहे का मला असा कसा हाथ लावतेस तू? मुंबईच्या घरी जवळीक साधल्यास आपण इथे कसं काही करणार आईला सगळं ऐकू जाईल. तळगाव, मालवणच्या घरी जवळीक साधल्यास म्हणायचा, इकडे आपण काही करू शकत नाही, खाली रवी दादाला (मदतनीस) सगळं ऐकू जाईल, असंही गिरीजा राऊत यांनी तक्रारीत म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *