रोहित पवार यांचे भुवया उंचावणारं वक्तव्य; पक्की माहिती शिकार होणार…

rohit-pawar
Share

मुंबईः राज्यात गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या तिन्ही पक्षात धुसफूस सुरू असल्याची चर्चा आहे. विविध राजकीय नेत्यांची प्रकरणं समोर येत आहेत. त्यामुळे शिवसेना शिंदे गटासह अजित पवार गटाच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत महाराष्ट्रात काहीतरी मोठं घडणार असल्याचं भाकीत रोहित पवार यांनी केले आहे. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याचं प्रकरण असंच बाहेर आलं नाही. ही फक्त सुरुवात आहे, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे. आपल्याकडे पक्की माहिती असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. एक्स अकाऊंटवर पोस्ट लिहून रोहित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अजित पवार यांच्या आठवणींवर स्मरणग्रंथ होणार प्रकाशित; अनुभव व लेख पाठविण्याचे आवाहन…

रोहित पवार यांनी एक्स अकाऊंटवर लिहिलं की, “भाजपचे सत्तेतले मित्रपक्ष विरोधी पक्षाचे आमदार- खासदार फोडणार असल्याच्या बातम्या आपण बघितल्या. परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत सत्तेतल्या मोठ्या पक्षाकडून सत्तेतल्या त्यांच्या मित्रांचीच शिकार केली जाणार असल्याची पक्की माहिती आहे. महाराष्ट्राला काळिमा फासणारे भोंदू खरात प्रकरण असंच बाहेर आलेलं नाही तर ठरवून आणलं गेलं असून ही फक्त सुरुवात आहे.”

“आज भाजप मित्रपक्षांप्रती जरी ‘ए दोस्ती हम नही छोडेंगे’ ची भावना दाखवत असले तरी उद्या मित्रपक्षांची भावना भाजपाबाबत “जा बेवफा जा हमे…” याहून वेगळी असणार नाही, हे नक्की आहे. त्यामुळे आपलीच भाजपकडून शिकार होऊ नये यासाठी मित्रपक्षांनी अधिक काळजी घेणंच उचित राहील”, असं रोहित पवारांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यांनी ‘काम_कमी_कुरापती_जास्त’ असा हॅशटॅग देखील वापरला आहे. रोहित पवारांच्या वक्तव्यानंतर आता पुढच्या दीड महिन्यात नक्की काय घडणार? याबाबत तर्क वितर्क सुरू झाले आहेत.

चर्चेचा विषय! रोहित पवार यांचे काळजाला भिडणारे आवाहन, म्हणाले…

रोहित पवार यांचा गौप्यस्फोट, अजित दादांच्या घराबाहेर अनेक नेत्यांची करंगळी कापली…

अजितदादा विमान दुर्घटनेवरुन रोहित पवारांचा गौप्यस्फोट; माझ्याकडे मोठी माहिती…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *