मुंबई : अजित पवार यांच्या अपघातानंतर 2 महिने झाली तरी तपास अधिकाऱ्यांकडे स्मरणपत्र दिलेले नाही, सीआयडीकडे काय चाललयं हे माहित नाही. राज्यात आम्ही विविध ठिकाणी जाऊन गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला तेही झालं नाही, पण कर्नाटकमध्ये आम्ही जाऊन आलो. कर्नाटकमध्ये आम्ही प्रयत्न केले ते सरकार दादांना न्याय देण्यासाठी पुढे सरसावले असून , त्यांनी झिरो एफआयआर करुन डिजींकडे पाठवला, असे म्हणत आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत गुन्हा नोंद झाल्याची माहिती दिली.
अजित पवार यांच्या आठवणींवर स्मरणग्रंथ होणार प्रकाशित; अनुभव व लेख पाठविण्याचे आवाहन…
आम्हाला जमलं ते आम्ही केलं, पाठपुरावा केला. त्यामुळे, कर्नाटकात झिरो एफआयआरने गुन्हा नोंद झाला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच, अजित दादा जिवंत असताना त्यांच्या घराबाहेर काळी जादू करण्यात आली, पक्षातील अनेक नेत्यांची करंगळी कापली, असा गौप्यस्फोट रोहित पवार यांनी केला आहे.
आम्ही राहुल गांधींना भेटलो, ते म्हणाले ज्या राज्यात न्याय मिळू शकतो, अशा राज्यांत जावा, गवई साहेबांचे उदाहरण आहे. कर्नाटकात दादांच्या अपघातानंतर गुन्हा दाखल झाला, मी त्या राज्याचे आभार मानतो. मी फक्त कर्नाटकात गेलो, तिथे एका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून ०० ने तो राज्याकडे पाठवला. मी मरीनड्राईव्ह येथे गेलो तिथे एफआयआर घेतला नाही, मग मी बारामतीला गेलो, सीआयडीकडेही गेलो. मी कोर्टात गेलो असतो, हा गुन्हा नोंदवण्यासाठी खूप काही करावं लागते. मात्र त्यांच्याच पार्टीतले नेते कसे राजकारण करत आहे हे मी उद्या इथे सांगेन, असे म्हणत रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांनाही लक्ष्य केले आहे.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
नाशिक प्रकरणात एसआयटी करतात, चुकीच्या व्यक्तीला अटक करतात, जलद कारवाई होते. मग दादांच्या प्रकरणात का होत नाही. दादांच्या पक्षातील नेते सुद्धा काही बोलत नाही हे दुर्दैव आहे. सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचाच दबाव म्हणून जय पवार यांची पत्रकार परिषद झाली नाही, असा गौप्यस्फोटही रोहित पवार यांनी केला आहे. प्रफुल पटेल यांना याचा तपास व्हावा असे वाटत नाही, तो ब्लॅकबॉक्स कुठेही अमेरिकेला गेलेला नाही. एव्हीएशनमधील अनेक अधिकारी त्यांचे परिचयाचे, जवळचे आहेत. एआयव्हीला एकच सांगायचं आहे, 9 अहवाल असताना एकही बाहेर आणला नाही. महाराष्ट्र हा अपमान सहन करणार नाही, असे रोहित पवार यांनी म्हटले. तर, अजित पवार यांच्या मृत्यूबाबत काही गौप्यस्फोटही त्यांनी केले आहेत.
अजित पवार जिवंत होते तेव्हा त्यांच्या मुंबईच्या घराबाहेर ब्लॅकमॅजिक झालेले पाहिले. दादांच्या पक्षातील अनेक नेत्यांची करंगळी कापली, दादांची ताकद जावी आणि आपल्याला मिळावी हा हेतू कोणाचा होता हे तपासणं गरजेचं आहे, असे म्हणत रोहित पवार यांनी अशोक खरात प्रकरणाकडेही लक्ष वेधलं आहे. अजित दादांचं ते पद मिळवण्यासाठी कोणी कोणी ब्लॅकमॅजिक केले हे पाहणं महत्वाचे आहे. दादा असताना ते पद मिळणार नाही म्हणून ही काळी जादू केली असा गंभीर आरोपच रोहित पवार यांनी केला आहे. सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे, या केसमध्ये जी व्यक्ती अडकली जात आहे, कार्यकर्त्यांची इच्छा नसताना तटकरे कोणाची वर्णी लावत आहेत. इथे फक्त हवेत गोळीबार चालला आहे, दोन महिने आम्ही हाच विषय घेऊन होतो, इतर कुठलाही विषय आम्ही घेतला नाही.
कर्नाटक पोलिसांचे आभार. आता महाराष्ट्र पोलिसांची जबाबदारी वाढली असून या FIR चा तपास कशा पद्धतीने होतो याकडे आम्ही बारकाईने लक्ष ठेवू असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. तसेच, हा तपास निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीनेच झाला पाहिजे आणि अजितदादांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या मग भले ती कितीही मोठी शक्ती असली तरी त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, यासाठी शेवटपर्यंत लढू आणि जिंकू, असेही त्यांनी म्हटले.
खळबळजनक दावा! अजितदादांच्या घराबाहेर कथित जादूटोण्यामागे अशोक खरात…
अजितदादा विमान दुर्घटनेवरुन रोहित पवारांचा गौप्यस्फोट; माझ्याकडे मोठी माहिती…
अजितदादा अपघात की घातपात! रोहित पवार यांनी घेतली दिल्लीत बड्या नेत्यांची भेट…
रोहित पवार यांच्याकडून विमान अपघात अहवालाची चिरफाड; विमानाची रेकी…