मुंबई : नाशिकमधील भोंदूबाबा आणि महिला लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अशोक खरातप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (मंगळवार) सभागृहात निवेदन दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरातच्या संस्थेवरील सदस्यांचीही चौकशी होईल, असे सांगितले. त्यामुळे, याप्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांचीही चौकशी होणार आहे.
अजित पवार यांच्या आठवणींवर स्मरणग्रंथ होणार प्रकाशित; अनुभव व लेख पाठविण्याचे आवाहन…
अशोक खरात याच्या शिवनिका ट्रस्टच्या सर्व सदस्यांची चौकशी होणार असून नाशिक पोलिसांकडून शिवनिका स्ट्रस्टच्या सदस्यांची चौकशी होणार आहे. या ट्र्स्टमध्ये रुपाली चाकणकर या देखील सदस्य असल्यामुळे आता त्यांची देखील नाशिक पोलिसांकडून चौकशी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडून सभागृहात निवेदन देखील देण्यात आलं. दरम्यान यावेळी बोलताना खरात याच्या संपर्कात असलेल्या राजकीय नेत्यांची देखील चौकशी होणार असल्याचं फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच, खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांचीही चौकशी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
दरम्यान, रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले होते. या फोटोनंतर सोशल मीडियातून, विरोधी पक्षातील महिला नेत्यांनीही रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुपाली चाकणकर यांचा राजीनामा मागितला होता. रुपाली चाकणकर यांनीही आपला राजीनामा दिला असून आता त्यांचीदेखील चौकशी होणार असल्याची माहिती आहे. कारण, शिवनिका संस्थेवर सदस्य असलेल्या सर्वांची चौकशी केली जाणार आहे. त्यामध्ये, रुपाली चाकणकर ह्या देखील सदस्य पदाच्या यादीत पहिल्या स्थानावर आहेत.
अशोक खरातला नाशिक सत्र न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आणखी 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे, अशोक खरातचा मुक्का 29 मार्चपर्यंत एसआयटीच्या पोलीस कोठडीतच असणार आहे. आणखी सखोल तपास गरजेचा असल्याने, खरातच्या शिवनिका संस्थेच्या सदस्यांचीही चौकशी करण्यात येणार असल्याने ही कोठडी सुनावण्यात आली आहे.
अशोक खरातचा बड्या उद्योगपतीला फोन; ती महिला झाली प्रेग्नंट…
रूपाली चाकणकर यांच्या बोटाला दुखापत कशी झाली? सीसीटीव्हीमध्ये मिळेल पाहायला…
अशोक खरात स्वत: लैंगिक शोषण केल्यानंतर जोड्या जुळवायचा अन्…
अशोक खरात प्रकरणात राज ठाकरे यांनी घेतली उडी…
नाशिक! अशोक खरात याच्या विकृतीचा नवा Video समोर…
गंभीर आरोप! रुपाली चाकणकर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार…
नाशिकच्या अशोक खरातची कुंडली बाहेर; महिलांचं योनी शुद्धीकरण…
रुपाली चाकणकर यांनी व्हायरल फोटोंवर दिलं स्पष्टीकरण…
मोठी बातमी! रुपाली चाकणकरांचा महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा…
अशोक खरातचा आणखी एक भयंकर कांड, प्रसादात मिसळायचा घाणेरडा पदार्थ…
धक्कादायक कारण! रुपाली चाकणकरांनी सोमवती अमावस्येला हाताची अनामिका का कापलेली…
खळबळजनक दावा! अजितदादांच्या घराबाहेर कथित जादूटोण्यामागे अशोक खरात…
रुपाली चाकणकर फरार, बजाव टाली; महिला नेत्याच्या दाव्याने मोठी खळबळ…
मुख्यमंत्र्यांच्या हाती फाईल अन् अशोक खरातभोवती फास आवळला…
रुपाली पाटील यांचे रुपाली चाकणकर यांच्यावर खळबळजनक आरोप; 58 Video…
मोठी खळबळ! भोंदूबाबा अशोक खरातला अटक; 58 आक्षेपार्ह व्हिडीओ, रुपाली चाकणकर म्हणाल्या…
नाशिकच्या ‘कॅप्टन’ मांत्रिकाला अटक, 58 आक्षेपार्ह व्हिडीओ अन् राजकीय नेते…