मुंबईः नाशिकमधील प्रसिद्ध अंकशास्त्रज्ञ कॅप्टन अशोक खरात प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर अडचणीत सापडल्या आहेत. त्यांचे कॅप्टन खरात यांच्यासोबतचे काही फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल झाले आहेत. या सगळ्या घटनाक्रमानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. त्यांनी सोमवती अमावस्येला चाकणकर यांनी स्वत:चं अनामिका हे बोट कापलं होतं. जादूटोणा करण्याच्या उद्देशाने त्यांनी बोट कापल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी केला होता. याबाबत त्यांनी काही फोटो देखील दाखवले होते. ज्यात चाकणकरांच्या बोटाला जखम दिसत होती.
अजित पवार यांच्या आठवणींवर स्मरणग्रंथ होणार प्रकाशित; अनुभव व लेख पाठविण्याचे आवाहन…
या सगळ्या आरोपानंतर अखेर चाकणकरांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. त्यांनी सर्व आरोप खोडून काढले आहेत. आपण असं आपलं बोट कापलं नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. व्हायरल झालेले फोटो दाखवत त्या म्हणाल्या, “हा फोटो आहे १२ सप्टेंबरचा, याच्या पुढची एक तारीख खोडली आणि त्यावर दोन सप्टेंबर दाखवले. २ सप्टेंबरला अमावस्या- पोर्णिमा काहीतरी होती, पण यात चुकीचं दाखवलं. तुम्ही आजही माझं सोशल मीडिया अकाऊंट चेक केलं तर हे फोटो आहे तसेच आहेत. ते फोटो २ सप्टेंबरचे नाहीत, १२ सप्टेंबरचे आहेत.”
“दोन सप्टेंबरला आम्ही अजित दादांच्या दौऱ्यात होतो, हा माझा २ सप्टेंबरचा फोटो आहे, दोन सप्टेंबरचा हा फोटो पाहिल्यानंतर कुठंही माझ्या हाताला जखम नाही, हा दुसरा फोटो ४ सप्टेंबरचा आहे. मी माझ्या भागातील काही अधिकाऱ्यांशी बोलत आहे. रस्त्याची पाहणी करत आहे, यात माझ्या हाताला कुठेही जखम नाही. हा तिसरा पाच सप्टेंबरचा फोटो आहे, माझ्या हाताला कुठेही जखम नाही, त्यामुळे तो कुठला दिवस होता, काय विधी होता, आपल्याला काही माहीत नाही,” असेही चाकणकर म्हणाल्या.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
रुपाली चाकणकरांनी पुढे म्हणाल्या, ‘कायद्याच्या चौकटीतून आम्ही सगळ्यांना नोटीस पाठवूच. चुकीच्या पद्धतीने बदनामी करणं, अश्लील टीका टिप्पणी करणं, खोटे नरेटीव्ह सेट करणं, खोट्या बातम्या पसरवणं, या सगळ्यांच्या बाबतीत मी कायद्याच्या चौकटीत राहून प्रक्रिया नक्की करेन. मी पुन्हा सांगते, यामध्ये जी व्यक्ती आहे, ती दोषी आहे, त्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, आपल्याला कोणत्याही व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहीत असायचं काहीही कारण नाही. आज आपण ज्याच्याबरोबर आहोत, ते पुढे जाऊन चार-पाच वर्षांनी काय करणार आहेत, याची कल्पना आपल्याला नसते. त्यामुळे या व्यक्तीवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी मी आज केली आहे.”
दरम्यान, “ज्या बाई राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. त्या २ सप्टेंबर २०२४ ला सोमवती अमावस्येच्या दिवशी स्वत:ची अनामिका कापून अशा पद्धतीने तंत्र-मंत्र करतात असं पीडित महिला सांगतात. सप्टेंबर ते जानेवारी दरम्यान चाकणकर यांच्या हातावर जखम होती. हे गंभीर आहे” असं सुषमा अंधारे म्हणाल्या. “रुपाली चाकणकर यांना त्या पदावरुन हटवण्यात यावं. चाकणकर आणि खरात यांना समोरासमोर बसवून चौकशी करा आणि त्यांची नार्को टेस्ट करा” अशी तीन प्रमुख मागण्या सुषमा अंधारे यांनी केल्या. चाकणकर आणि खरात यांचे सीडीआर तपासले पाहिजेत. त्यांचं किती वेळा, कोणत्या वेळी बोलणं झालं हे समजलं पाहिजे” अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली.
मोठी बातमी! रुपाली चाकणकरांचा महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा…
अशोक खरातचा आणखी एक भयंकर कांड, प्रसादात मिसळायचा घाणेरडा पदार्थ…
धक्कादायक कारण! रुपाली चाकणकरांनी सोमवती अमावस्येला हाताची अनामिका का कापलेली…
खळबळजनक दावा! अजितदादांच्या घराबाहेर कथित जादूटोण्यामागे अशोक खरात…
रुपाली चाकणकर फरार, बजाव टाली; महिला नेत्याच्या दाव्याने मोठी खळबळ…
मुख्यमंत्र्यांच्या हाती फाईल अन् अशोक खरातभोवती फास आवळला…
रुपाली पाटील यांचे रुपाली चाकणकर यांच्यावर खळबळजनक आरोप; 58 Video…
मोठी खळबळ! भोंदूबाबा अशोक खरातला अटक; 58 आक्षेपार्ह व्हिडीओ, रुपाली चाकणकर म्हणाल्या…
नाशिकच्या ‘कॅप्टन’ मांत्रिकाला अटक, 58 आक्षेपार्ह व्हिडीओ अन् राजकीय नेते…
अजितदादा विमान दुर्घटनेवरुन रोहित पवारांचा गौप्यस्फोट; माझ्याकडे मोठी माहिती…