मुंबई : नाशिकमधील स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ आणि गुरू कॅप्टन अशोक खरात याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाली आहे. अशोक खरात याचे कारनामे आता समोर येत असून धक्कादायक माहिती समोर येत आहे. अशोक खरात हा प्रसादामध्ये कफ सिरपमध्ये व्हायग्रा मिसळून देत असल्याचा खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.
अजित पवार यांच्या आठवणींवर स्मरणग्रंथ होणार प्रकाशित; अनुभव व लेख पाठविण्याचे आवाहन…
अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत म्हटले की, ‘अशोक खरातला केवळ ‘भोंदू’ म्हणू नका, तो एक ‘विकृत’ माणूस आहे ज्याने शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केले आहे. खरात हा कफ सिरपमध्ये ‘व्हायग्रा’ मिसळून ‘ओशनो जल’ तयार करायचा. हे जल घेण्यासाठी अनेक बडे राजकारणी आपल्या गाड्या पाठवायचे. यामध्ये तिरुपती मंदिराचे ट्रस्टी आणि मुंबईतील एका बड्या डेप्युटी कलेक्टरचाही समावेश आहे. श्रीमंत लोकांना पैशांसाठी लुटले जायचे, तर मध्यमवर्गीय महिलांचे लैंगिक शोषण केले जायचे.’

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
खरात ‘ओशनो प्रे’ आणि ‘सिद्ध प्रे’ नावाचे कार्यक्रम राबवायचा. यामध्ये ११ वेळा जप करायला सांगून शंकराच्या पिंडीवरील हंडा हलवून लोकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली जात असत. सिद्ध प्रेमध्ये लोकांना सापाचे आवाज ऐकू येणे किंवा आकृत्या दिसणे असे भास निर्माण केले जात होते. लोकांना एकप्रकारे संमोहित केले जायचे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर दमानिया यांनी अत्यंत कडक शब्दांत टीका केली. “चाकणकर या थर्ड क्लास बाई आहेत. २४ तासांच्या आत राजीनामा दिला नाही, तर महाराष्ट्रातील महिलांनी रस्त्यावर उतरावे,” असे आवाहन अंजली दमानिया यांनी केले आहे.
धक्कादायक कारण! रुपाली चाकणकरांनी सोमवती अमावस्येला हाताची अनामिका का कापलेली…
खळबळजनक दावा! अजितदादांच्या घराबाहेर कथित जादूटोण्यामागे अशोक खरात…
रुपाली चाकणकर फरार, बजाव टाली; महिला नेत्याच्या दाव्याने मोठी खळबळ…
मुख्यमंत्र्यांच्या हाती फाईल अन् अशोक खरातभोवती फास आवळला…
रुपाली पाटील यांचे रुपाली चाकणकर यांच्यावर खळबळजनक आरोप; 58 Video…
मोठी खळबळ! भोंदूबाबा अशोक खरातला अटक; 58 आक्षेपार्ह व्हिडीओ, रुपाली चाकणकर म्हणाल्या…
नाशिकच्या ‘कॅप्टन’ मांत्रिकाला अटक, 58 आक्षेपार्ह व्हिडीओ अन् राजकीय नेते…
अजितदादा विमान दुर्घटनेवरुन रोहित पवारांचा गौप्यस्फोट; माझ्याकडे मोठी माहिती…