राज्य सरकारचा मोठा निर्णय! महसूल अधिकाऱ्यांसाठी नवीन नियमावली जाहीर…

mantralaya
Share

मुंबई : महसूल विभागातील राजपत्रित अधिकारी वारंवार आणि दीर्घकाळ इतर विभाग किंवा महामंडळांमध्ये प्रतिनियुक्तीवर जात असल्याने मूळ कामकाजावर परिणाम होत असल्याचे लक्षात आले आहे. या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने नवीन मार्गदर्शक नियमावली जारी केली असून, आता प्रतिनियुक्ती पूर्ण केल्यानंतर अधिकाऱ्यांना मूळ विभागात किमान ३ वर्षे सेवा देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

नवीन नियमांनुसार, कोणत्याही अधिकाऱ्याने प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्याला पुन्हा प्रतिनियुक्तीवर जाण्यापूर्वी मूळ विभागात किमान तीन वर्षे काम करावे लागणार आहे. या कालावधीशिवाय पुढील प्रतिनियुक्तीचा प्रस्ताव विचारात घेतला जाणार नाही. नियमावलीनुसार, अधिकाऱ्यांना सुरुवातीला जास्तीत जास्त ३ वर्षांसाठीच प्रतिनियुक्तीवर जाता येईल. यामुळे दीर्घकाळ बाहेर राहण्याची प्रवृत्ती रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अजित पवार यांच्या आठवणींवर स्मरणग्रंथ होणार प्रकाशित; अनुभव व लेख पाठविण्याचे आवाहन…

नवीन नियम अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार तसेच भूमी अभिलेख विभागातील सर्व राजपत्रित अधिकाऱ्यांना लागू असतील. त्यामुळे या निर्णयाचा मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय यंत्रणेवर परिणाम होणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा मंत्र्यांच्या आस्थापनेवर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांसाठी प्रतिनियुक्तीचा कालावधी जास्तीत जास्त ५ वर्षे निश्चित करण्यात आला आहे. त्यापेक्षा जास्त काळासाठी प्रतिनियुक्ती हवी असल्यास मुख्यमंत्र्यांची विशेष मान्यता घेणे आवश्यक राहील.

विशेष परिस्थितीत प्रतिनियुक्तीच्या कालावधीत केवळ १ वर्षाची मुदतवाढ दिली जाऊ शकते. मात्र, यासाठी संबंधित अधिकाऱ्याने मूळ विभागाची पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य आहे.

राज्यातील गायरान जमिनींबाबत सरकारचा महत्वाचा निर्णय…

सरकारचा मोठा निर्णय! शेतजमिनीवर घर, इमारत बांधकाम परवानगीसाठी आता…

गुंठेवारीत जमीन खरेदी-विक्री करणाऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *