पुणे: बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये आज (गुरुवार 29 जानेवारी) राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अत्यंत शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात निरोप देण्यात आला. अजित पवारांच्या पार्थिवाला चिरंजीव पार्थ आणि जय पवार यांनी मंत्राग्नि दिला. यावेळी भावूक वातावरण होते. हजारोंच्या संख्येने चाहते उपस्थित होते.
राज्याच्या राजकारणातील एक झंझावात आणि बारामतीकरांचे लाडके ‘दादा’ म्हणजेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रत्येकाच्या डोळ्यात आज अश्रू होते, तर आसमंत ‘अजितदादा अमर रहे’च्या घोषणांनी दुमदुमून गेला होता. राज्याच्या राजकारणातील मागील चार दशकांपासूनचे एक पर्व आज समाप्त झाले. अजित पवारांच्या निधनाने राजकारणच नव्हे तर सहकार ते सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातही शोककळा पसरली आहे.
विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात समर्थकांनी अजित दादा अमर रहे चा गजर करत आपल्या लाडक्या दादाला निरोप दिला. यावेळी महिलांसह कार्यकर्त्यांनी केलेला आक्रोश अजितदादांच्या प्रेमाची साक्ष देत होता. अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात चबुतरा उभारण्यात आला होता.
अजित पवार यांचे पार्थिव सकाळी काटेवाडीत ठेवण्यात आले होते. यावेळी हजारोंचा जमावाला अश्रू अनावर झाले. यावेळी झालेली अभूतपूर्व गर्दी पोलिसांना सुद्धा रोखणं अशक्य झालं होते. आमदार रोहित पवार यांनी केलेल्या विनंतीनंतर जमाव नियंत्रित झाला. अजित पवार यांनी मुळगावी श्रद्धांजली वाहिल्यानंतर त्यांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठानमध्ये आणण्यात आले. यावेळी अजित पवार यांच्या पार्थिवाचे पत्नी खासदार सुनेत्रा पवार, अजित पवार यांच्या भगिनी तसेच सून यांनी अंत्यदर्शन घेतले.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
अजित पवार यांना राजकीय दिग्गजांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली…
अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी देशभरातून राजकीय नेते बारामतीमध्ये दाखल झाले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष नितीन नबिन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, छगन भुजबळ, खासदार शाहू महाराज छत्रपती, आंध्र प्रदेश सरकारमधील नारा लोकेश, गिरीश महाजन, मंत्री रक्षा खडसे, माधुरी मिसाळ, नीलम गोऱ्हे, अदिती तटकरे, पंकजा मुंडे, गणेश नाईक, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, जयंत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, राहुल कुल, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, जयकुमार गोरे, नरहरी झिरवळ, शिवेंद्रराजे भोसले, हर्षवर्धन पाटील, दत्तामामा भरणे, प्रफुल पटेल, रितेश देशमुख, मेधा कुलकर्णी, निवेदिता माने, अमोल कोल्हे, राजेश टोपे, सुरेश धस, संजय दिना पाटील, सचिन अहिर, मेघना बोर्डीकर, मकरंद पाटील, शंभूराज देसाई, मंगलप्रभात लोढा, प्रकाश आबिटकर, श्रीकांत शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी अजित पवार यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली अर्पण वाहिली.
View this post on Instagram
विमानात बसण्यापूर्वी अजितदादा यांचा पत्नी सुनेत्रा पवार यांना शेवटचा फोन; म्हणाले…
Video: पाणावलेले डोळे, आवंढा गिळत शरद पवार पुतण्याबद्दल म्हणाले, अजित…
अजित पवार यांची घड्याळावरुन पटली ओळख; थरारक कहाणी…
अहमदाबाद विमान अपघाताचा Video रेकॉर्ड करणारा पोलिसांच्या ताब्यात…
हृदयद्रावक! विमानाच्या शेपटीत एअर होस्टेसचा मृतदेह पाहून डोळ्यात अश्रू…
विमानातून बचावलेल्या एकमेव प्रवाशाने सांगितला थरार! एअर होस्टेस जळत होत्या…
दिल्लीत विमान लँडिंग होताच पायलटचा मृत्यू; नुकतंच झालं होतं लग्न…