भदोहीः उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्याचे नाव बदलून संत रविदास नगर असे ठेवण्यात येणार आहे. भदोही येथील एका कार्यक्रमात नव्या नावाची घोषणा करताना योगी आदित्यनाथ म्हणाले, भदोही जिल्हा आता ‘संत रविदास नगर भदोही’ या नावाने ओळखला जाईल. मुख्यमंत्री योगी म्हणाले की, भविष्यात भदोही गालिचा उद्योगात नवीन उंची गाठेल.
मुख्यमंत्री योगी म्हणाले, संत रविदास यांनी आपल्या ध्यानातून समाजाला एकसंध करण्याचे कार्य केले होते, आता भदोही या संताच्या नावाने ओळखले जाईल. मध्ययुगात संत रविदास यांनी म्हटले होते, की तुम्हाला असे राज्य हवे आहे जिथे प्रत्येकाला अन्न मिळेल, लहान-मोठे सर्व एकत्र राहतील आणि सेवक आनंदी राहतील.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, की ज्या संतांनी ६०० वर्षांपूर्वी त्यांनी व्यक्त केलेली इच्छा पूर्णत्वास नेण्याचे आणि कोणत्याही भेदभावाशिवाय योजनांचे लाभ मिळण्यासाठी, असा नियम अस्तित्वात आला पाहिजे. योगी आदित्यनाथ यांनी भदोही येथील १,३४० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या ११२ प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.
दरम्यान, मुख्यमंत्री योगी यांनी त्यांच्या ‘एक्स हँडल’वर लिहिले, की आशियातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय हस्तनिर्मित गालिच्यांच्या व्यापार मेळाव्याच्या, ‘इंडिया कार्पेट एक्स्पो’च्या सुवर्ण महोत्सवी प्रदर्शनाचे भदोही जिल्ह्यात उद्घाटन झाले. या प्रसंगी, गालिचा उद्योगाशी संबंधित निर्यातदार, विक्रेते आणि प्रमुख उद्योजकांशी संवाद साधला आहे.