संजय राऊत भडकले; भाजपने कमाल केली! पानभर जाहिराती…

sanjay-raut
Share

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांना आदरांजली वाहणाऱ्या जाहिराती भारतीय जनता पक्षाकडून सर्वच वर्तमान पत्रांत दिल्या गेल्या. या प्रकारावर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. अशा श्रद्धांजली वाहून काय होणार? सिंचन घोटाळ्याचे तुम्ही केलेले आरोप मागे घ्या, हीच त्यांना श्रद्धांजली असेल, असे राऊत म्हणाले.

जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार बुधवारी (ता. २८) बारामतीला जात असताना विमान अपघातात त्यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती सांगत भारतीय जनता पक्षाने गुरूवारी त्यांना आदरांजली वाहणाऱ्या जाहिराती विविध वर्तमानपत्रांत दिल्या. ज्या भारतीय जनता पक्षाने अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप केले, ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार केला असे म्हणत हिणवले, त्याच अजित पवार यांच्या जाण्यानंतर सहानुभूतीसाठी भाजपने जाहिराती दिल्याचे अप्रत्यक्षपणे सांगत राऊत यांनी भाजपच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

भाजपने कमाल केली! अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पान भर जाहिराती दिल्या! त्याने काय होणार? अजितदादांवर भाजप म्हणजेच पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले ७० हजार कोटींचे आरोप मागे घेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे संजय राऊत म्हणाले.

जलसंपदा मंत्री असताना अजित पवार यांनी ७० हजार कोटींचा घोटाळा केला, त्यांची जागा तुरुंगात असेल, असा आक्रमक प्रचार भारतीय जनता पक्षाने लोकसभा आणि विधानसभा निवडणूक २०१४ साली केला. आघाडी सरकारवर प्रचंड भ्रष्टाचाराचे आरोप करून भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात रान उठवले. लोकांनीही भाजपच्या प्रचाराला साथ देऊन आघाडीचे सरकार घालवले. राज्यात भाजपचे सरकार आले. दरम्यानच्या काळात अजित पवार यांच्यावर सातत्याने सिंचन घोटाळ्याच्या आरोपांचा पुनरुच्चार झाला. २०१९ ला आकडे जुळत नसतानाही शरद पवार यांनी महाविकास आघाडीची मोट बांधून राष्ट्रवादीला सत्तेत बसवले. परंतु एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून बंड केल्यानंतर आघाडीचे सरकार गेले. काही महिने विरोधी पक्षात काम केल्यानंतर अजित पवारही सत्तेच्या वळचणीला गेले. तेव्हाही अधून मधून त्यांच्यावर कधी खासगीत तर कधी उघड भाजपचे नेते बोलत राहिले. अगदी महापालिका निवडणुकीत भाजपच्या अनेक नेत्यांनी अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्यावरून आरोप केले. यावर बोलताना अजित पवार यांनी उद्विग्न प्रतिक्रिया दिली होती. ज्यांनी आरोप केले त्यांच्यासोबतच सत्तेत बसलोय की नाही… असे म्हणत त्यांनी भाजपलाच खिंडीत गाठले. याचाच अर्थ अखेरच्या दिवसांपर्यंत सिंचन घोटाळ्याच्या आरोपांनी अजित पवार यांची पाठ सोडली नाही.

‘कामाचा माणूस’ अजित पवार अनंतात विलीन; जमावाला अश्रू अनावर…

विमानात बसण्यापूर्वी अजितदादा यांचा पत्नी सुनेत्रा पवार यांना शेवटचा फोन; म्हणाले…

Video: पाणावलेले डोळे, आवंढा गिळत शरद पवार पुतण्याबद्दल म्हणाले, अजित…

अजित पवार यांची घड्याळावरुन पटली ओळख; थरारक कहाणी…

अहमदाबाद विमान अपघाताचा Video रेकॉर्ड करणारा पोलिसांच्या ताब्यात…

हृदयद्रावक! विमानाच्या शेपटीत एअर होस्टेसचा मृतदेह पाहून डोळ्यात अश्रू…

विमानातून बचावलेल्या एकमेव प्रवाशाने सांगितला थरार! एअर होस्टेस जळत होत्या…

दिल्लीत विमान लँडिंग होताच पायलटचा मृत्यू; नुकतंच झालं होतं लग्न…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *