पुणे: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी (ता. २८) बारामतीजवळ विमान अपघातात निधन झाले. अजित पवार यांच्यावर आज बारामतीतील विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अजित पवार यांचे विमानात बसण्याआधी पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी फोनवरून बोलणं झाले होते. सकाळी नाष्टा करत असताना अजित पवार यांनी खासदार असलेल्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संवाद साधत खास सल्ला दिला होता. ज्यावेळी फोनवर बोलणं झालं होतं, त्यावेळी अजित पवारांसोबत त्यांचे पीए आणि सुरक्षा कर्मचारी होते. दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं होतं, याबाबतचा खुलासा त्यांनी स्वत: केला आहे.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
बारामतीत अजित पवार यांच्या चार सभांचं आयोजन केले होते. त्यामुळे ते सकाळी लवकर उठून बारामतीला रवाना झाले होते. बारामतीला निघण्यापूर्वी अजित पवार यांनी आपल्या देवगिरी बंगल्यावर नाष्टा केला होता. नाष्टा करत असताना त्याने पत्नी सुनेत्रा पवार यांना फोन केला होता. यावेळी दोघांमध्ये संसदेत सुरू असलेल्या बजेट सत्रावर चर्चा झाली. राष्ट्रपतींचे अभिभाषण लक्ष देऊन ऐक, असा सल्ला अजित पवारांनी खासदार असलेल्या सुनेत्रा पवार यांना दिला होता.
अजित पवार सकाळी नाष्टा झाल्यानंतर सात वाजून १० मिनिटांनी देवगिरी बंगल्यावरून मुंबई विमानतळाकडे गेले. यावेळी त्यांच्यासोबत सुरक्षा कर्मचारी आणि पीए देखील होते. पण विमानतळावर गेल्यानंतर हे सर्वजण रिटर्न आले. अजित पवार आपले सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांना घेऊन स्पेशल चार्टर विमानाने बारामतीला आले. पण लँडिंगदरम्यान झालेल्या अपघातात त्यांचा दुर्दैवी अंत झाला.
View this post on Instagram
Video: पाणावलेले डोळे, आवंढा गिळत शरद पवार पुतण्याबद्दल म्हणाले, अजित…
अजित पवार यांची घड्याळावरुन पटली ओळख; थरारक कहाणी…
अहमदाबाद विमान अपघाताचा Video रेकॉर्ड करणारा पोलिसांच्या ताब्यात…
हृदयद्रावक! विमानाच्या शेपटीत एअर होस्टेसचा मृतदेह पाहून डोळ्यात अश्रू…
विमानातून बचावलेल्या एकमेव प्रवाशाने सांगितला थरार! एअर होस्टेस जळत होत्या…
दिल्लीत विमान लँडिंग होताच पायलटचा मृत्यू; नुकतंच झालं होतं लग्न…