अजितदादांवरची चित्रफित पाहून सुनेत्रा पवार यांच्या डोळ्यातले अश्रू थांबेनात…

ajit-pawar-sunetra-pawar
Share

बारामती : अजित पवार यांच्यावरची चित्रफीत बघितल्यानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भावुक झाल्या होत्या. दादा आपल्यात नाहीत, हे मानायला मन तयार नाही. ३५ वर्ष साहेबांच्या पावलावर पाऊल टाकून दादांनी ही बारामती उभी केली. अजूनही बारामतीकर मोबाईलवर दादांचे व्हिडीओ पाहतात, त्यांची भाषण ऐकतात. बारामतीकरांच्या डोळ्यातले अश्रू थांबत नाहीत. कारण दादा नाहीत यावर त्यांचा विश्वासच बसत नाही. अनेकजण म्हणतात दादा परत येतील पण दादा आपल्यात नाही हे कटू सत्य स्वीकारावं लागेल. बारामतीला देशात १ नंबरचा तालुका बनवण्याचे स्वप्न होते. ते स्वप्न आपण पूर्ण करू, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या.

बारामतीच्या तीन पिढ्या दादांच्या विचारांशी मनापासून जोडलेल्या आहेत. ही केवळ साथ नाही तर भावनेने बांधलेली घट्ट कौटुंबिक नाळ आहे. म्हणूनच तीन पिढ्यांचा विश्वास, आपुलकी हीच दादांच्या कार्याची खरी ताकद आहे. मी एका संघर्षयोद्ध्याची सहचारिणी आहे. दादा गेल्यानंतर संपूर्ण राज्याने प्रेम दिले. मला आणि माझ्या दोन्ही मुलांवर भरभरून प्रेम केले, असे सांगताना राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भावुक झाल्या होत्या.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!

अजित पवार यांच्या अपघाती निधनाने रिक्त झालेल्या बारामती विधानसभेसाठी पोटनिवडणूक होत आहे. आज प्रचाराच्या सांगता सभेला सुनेत्रा पवार यांनी सभेला संबोधित करताना भावुक भाषण केले. अजित पवार यांच्या ३५ वर्षांच्या राजकारणाची वैशिष्ट्ये सांगत इथून पुढेही त्यांच्या विचारांवरच चालण्याची ग्वाही सुनेत्रा पवार यांनी दिली. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांवरच आम्ही राजकारण समाजकारण करू, असा शब्दही सुनेत्रा पवार यांनी बारामतीच्या जनतेला दिला. बारातमी पोटनिवडणुकीसाठीच्या सांगता सभेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित आहेत.

सुनेत्रा पवार यांच्या भाषणाआधी अजित पवार यांची चित्रफित दाखविण्यात आली. ही चित्रफित पाहून सुनेत्रा पवार यांच्यासह मंचावरील अनेक नेते भावुक झाले. चित्रफित सुरू असताना सुनेत्रा पवार अनेकदा रडल्या. भाषणात अजित पवार यांच्या विचारांना उजाळा देताना त्यांच्यासारखेच काम करून दाखवेन, असा विश्वास व्यक्त करताना मी संघर्ष योद्ध्याची सहचारिणी असल्याचे त्या म्हणाल्या.

सुनेत्रा पवार यांच्या विरोधातील उमेदवारी माघारी घेऊन त्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी त्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच महाविकास आघाडीचे आभार मानले. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचा विशेष नामोल्लेख करून त्यांच्या पाठिंब्यासाठीही जाहीर आभार मानले.

अजितदादांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका; सुनेत्रा पवार आक्रमक…

बारामतीत बॅनरची चर्चा! शरद पवार यांनी सांगूनही सुनेत्रा पवार यांनी नाही ऐकलं…

बारामतीत सुनेत्रा पवार यांच्यासमोर निवडणुकीत 23 उमेदवारांचे आव्हान…

अजित पवार यांच्या आठवणीत सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या…

बारामतीत रणशिंग! अजित पवार यांचा वारसा सांभाळण्यासाठी सुनेत्रा पवार मैदानात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *