मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचे आज (बुधवार, 28 जानेवारी) सकाळी बारामती विमानतळावर भीषण अपघातात निधन झाले. या भयावह अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.
अजित पवारांच्या निधनानं महाराष्ट्रावर शोककळा पसरली. पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, बहीण सुप्रिया सुळे या दिल्लीत होत्या. त्या तातडीने बारामतीकडे रवाना झाल्या. अजित पवार यांचे काका आणि ज्येष्ठ नेते शरद पवार हे तातडीने हेलिकॉप्टरमधून बारामतीला पोहोचले. विमानतळावर उतरताच विमान कसं आणि कुठं कोसळलं, असा पहिला प्रश्न त्यांनी तिथं उपस्थित असलेल्यांना विचारला. अपघातानंतर शरद पवार यांनी हा अपघात असून याचे राजकारण करून नये , असे आवाहन केले आहे.
अजित पवार यांच्या निधनाबाबत शरद पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हा कुटुंबासाठी मोठा धक्का आहे. झालेले नुकसान कधीही भरून निघणारं नाही, हे कोणाच्या हातात नव्हतं. हा एक निव्वळ अपघात आहे. यात राजकारण नाही. अजित पवार हे राजकारणातील एक प्रभावी व्यक्तिमत्व होते. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. एक कर्तृत्ववान नेता ज्याच्याकडे निर्णय घेण्याची क्षमता होती, त्या नेतृत्वाला महाराष्ट्र आज मुकला आहे. महाराष्ट्राचे हे न भरून येणारे नुकसान आहे. हा अपघात असून यामध्ये कुठलेही राजकारण नाही. हा केवळ अपघात आहे.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
दरम्यान, बिझनेस क्लासचा बादशाह अशी ओळख असलेल्या व्हीएसआर’ या ऑपरेटरचे ‘लिअरजेट 45’ श्रेणीतील हे विमान. पण, याच विमानानं अजित पवारांचा घात केला.. मुंबईहून सकाळी बारामतीच्या दिशेनं निघालेल्या विमानात सकाळी 8 वाजून 46 मिनिटांनी बारामती विमानतळावर लँडिंग करत असताना तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे विमानाचा भीषण अपघात झाला. एअरपोर्ट जवळील पेट्रोल पंपावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही थरारक दृश्यं कैद झाली आहेत. यात 8 वाजून 46 मिनिटांनी विमान कोसळताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट होतो. त्यानंतर आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट आकाशात पसरल्याचे दिसत आहे. अपघात इतका भिषण होता की संपूर्ण परिसरात स्फोटाचे आवाज ऐकू आले. एकापाठोपाठ एक असे तीन ते चार स्फोट झाल्यानंतर दुर्घटनाग्रस्त विमानाला आग लागली होती.
अजित पवार यांची घड्याळावरुन पटली ओळख; थरारक कहाणी…
अहमदाबाद विमान अपघाताचा Video रेकॉर्ड करणारा पोलिसांच्या ताब्यात…
हृदयद्रावक! विमानाच्या शेपटीत एअर होस्टेसचा मृतदेह पाहून डोळ्यात अश्रू…
विमानातून बचावलेल्या एकमेव प्रवाशाने सांगितला थरार! एअर होस्टेस जळत होत्या…
दिल्लीत विमान लँडिंग होताच पायलटचा मृत्यू; नुकतंच झालं होतं लग्न…