सिंधुदुर्ग: नगरपरिषद निवडणुकीदरम्यान शिंदे गटाचे आमदार निलेश राणे आणि भाजप यांच्यातील तीव्र संघर्ष दिसत आहे. मालवणमध्ये पोलिसांच्या विशेष पथकाने मध्यरात्री नाकाबंदीवेळी एक कार पकडली. संबंधित कार भाजपचे भाजपचे देवगड तालुका अध्यक्ष महेश नारकर यांची होती. या गाडीत दीड लाखांची रोकड सापल्यानंतर खळबळ उडाली.
पोलिसांनी कारसकट भाजपच्या पदाधिकाऱ्याला मालवण पोलिस ठाण्यात नेले. यानंतर काहीवेळातच निलेश राणे हे देखील पोलिस ठाण्यात पोहोचले. यावेळी त्यांनी पोलिसांना अद्याप भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हा का दाखल झाला नाही, असे सवाल विचारत फैलावर घेतले. नेमक्या त्याचवेळी पोलिस ठाण्याच्या आवारात आणखी एक कार आली. या कारमधील व्यक्ती भाजपच्या लोकांना सोडवायला आल्याचे निलेश राणे यांनी सांगितले. विशेष म्हणजे या कारच्या मागच्या आणि पुढच्या बाजूला कोणतीही नंबरप्लेट नव्हती. गाडीच्या पुढच्या सीटवर भाजपचे चिन्ह असलेला गमछा होता. नंबरप्लेट नसलेली कार थेट पोलिस ठाण्यात कशी आली, याची चर्चा रंगली आहे. निलेश राणे यांनी नंबरप्लेट असलेली कार तातडीने जप्त करुन त्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
पोलिसांच्या विशेष पथकाने दीड लाखांची रोकड असलेली गाडी पकडल्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना पोलिस ठाण्यात आणले. पोलिसांनी सुमोटो तक्रार दाखल करुन घेतली. निलेश राणे यांनी यासंदर्भातील एक व्हिडीओ दाखवला. या व्हिडीओत भाजपचा एक कार्यकर्ता पोलिसांशी बोलताना दिसत आहे. ‘तुम्ही गाडीत सापडलेले पैसे ठेवून घ्या, पण कार्यकर्त्यांना सोडा’, असे हा भाजपचा पदाधिकारी पोलिसांना सांगताना दिसत आहे. मात्र, पोलिसांनी निवडणूक अधिकारी याठिकाणी आले असून त्यांना तपास करायचा आहे, असे सांगताना दिसत आहेत.