मुंबई: महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच जागांसाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीने पदवीधर मतदारसंघांवर वर्चस्व गाजवत ३ जागांवर विजय मिळवला आहे, तर महायुतीला २ जागांवर समाधान मानावे लागले आहे.
पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीने भाजप आणि महायुतीला मोठा धक्का दिला. नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसच्या अभिजित वंजारी यांनी अत्यंत चुरशीच्या लढतीत बाजी मारली. पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद चंद्र पवार) पक्षाच्या हर्षदा देशमुख-जाधव यांनी विजय मिळविला. छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघातही राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाच्या प्रतापसिंग पाटील यांनी विजय मिळवत महाविकास आघाडीची पकड मजबूत केली.
View this post on Instagram
शिक्षक मतदारसंघांमध्ये महायुतीने आपले वर्चस्व राखले आहे. पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे विजयी झाले आहेत, तर अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या किरण सरनाईक यांनी बाजी मारली. एकूण ५ जागांच्या या निकालात पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर हे तिन्ही पदवीधर मतदारसंघ जिंकून महाविकास आघाडीने ३-२ अशी सरशी साधली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी ही जवळपास ४५ तास चालली.
विजयी उमेदवारांची यादी
> नागपूर पदवीधर – अभिजीत वंजारी (काँग्रेस)
> पुणे पदवीधीर – हर्षदा देशमुख-जाधव (राष्ट्रवादी शरद पवार)
> छत्रपती संभाजीनगर पदवीधर – प्रतापसिंह पाटील (राष्ट्रवादी शरद पवार)
> अमरावती शिक्षक – किरण सरनाईक (शिवसेना शिंदे)
> पुणे शिक्षक – कौस्तुभ गावडे (भाजप)
पुणे पदवीधरची मतमोजणी सुरु होताच उडाली एकच खळबळ…
मी आतुरतेने वाट पाहतोय, महाराष्ट्र माझ्या हातात सत्ता कधी देतोय: राज ठाकरे
One thought on “विधान परिषदेच्या ५ जागांचा निकाल जाहीर; पाहा विजयी उमेदवारांची नावे…”