मुंबई : हा महाराष्ट्र माझ्या हातात, सत्ता कधी देताय याची मी खरंच वाट पाहतोय, शिस्त आणणं हे काही रॉकेट सायन्स नाहीये याला फक्त इच्छा लागते, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे. नवी मुंबईतील मनसे वाहतूक सेनेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी वाहतुकीच्या मुद्यांवरुन भाष्य करताना चांगलंच फटकारलं. फुटपाथवर चालता येत नाही, आमच्याकडे बागा नाहीत, आमच्याकडे चांगली मैदान नाहीत, आणि सांगायचं 7.8 टक्के जीडीपी झालाय, अशी टीका त्यांनी केली.
शहरांचा पुरता बोजवारा उडालेला असताना वाहतूक कोंडी, शहर नियोजन अनेक प्रश्न कित्येक वर्षांपासून आक्राळ विक्राळ रूप धारण करीत असताना सरकार ढिम्मपणे पाहत आहेत. मी राज्य सरकारकडे अनेकदा प्रस्ताव देऊनही ते काहीच करीत नाहीत. हे प्रश्न सोडविण्यासाठी कोणतेही रॉकेट सायन्सची गरज नाही. गरज आहे केवळ इच्छाशक्तीची… हे सगळे प्रश्न सोडविण्यासाठी मी आतुरतेने वाट पाहतोय की महाराष्ट्र माझ्या हातात सत्ता कधी देतोय… असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.
View this post on Instagram
विदेशात शहर नियोजन अतिशय गांभीर्याने केले जाते. मात्र आपल्या इथे शहर नियोजनाला काडीची किंमत देत नाहीत. जिकडे ५० माणसांना राहण्याची जागा आहे तिकडे ५०० माणसं राहतायेत. त्यामुळे शहर नियोजनाचा पुरता बोजवारा उडाला आहे. इथे वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस अवघड बनत चालली आहे. दुचाकी चालवणाऱ्यांना सिग्नल आपल्यासाठी आहे, असे वाटतच नाही. पार्किंगसाठी जागा नाहीत, कुठेही कशाही गाड्या पार्क केल्या जातात. खेळण्यासाठी मैदाने नाहीत, फिरण्यासाठी बागा नाहीत, चालण्यासाठी फूटपाथ नाहीत. मात्र या नागरी प्रश्नांवर सरकारला काहीच वाटत नाही. त्यांची केवळ बिल्डरशी भागिदारी, त्यांना प्रकल्प देऊन केवळ पैशांची गणिते साधण्यात राजकारण्यांना रस आहे, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
नो पार्किंगचा फुटपाथ हा तुम्ही काळ्या आणि लाल पट्ट्यांमध्ये करा म्हणजे लोकांना समजेल की इथे पार्किंग करायचं नाही आणि जिकडे पार्किंग करायचं तिथे पिवळ्या आणि काळ्या पट्ट्यांमध्ये तो फुटपाथ रंगवला तर लोकांना सोपं जात बघायला. माझं पोलीस संरक्षण असून देखील मी माझ्या सर्व चालकांना माझी सख्त ताकीद असते सिग्नल मोडायचा नाही कितीही अर्जंट असेल काम तरी सिग्नल मोडायचा नाही. शहर म्हणून आम्ही कुठची शिस्त पाळत नाही, आहोत सरकार म्हणून कुठची शिस्त पाळली जात नाहीये आणि सगळ्या गोष्टींचा बोजा टाकायचा पोलिसांवर, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
राज ठाकरे यांच्याकडून अखेर ‘ती’ डॉक्युमेंटरी डिलीट, सांगितले खरे कारण…
पुढच्या निवडणुका EVM वर नको, बॅलेट पेपरवर घ्या : राज ठाकरे
यूपीआयच्या नव्या नियम लागू करण्यामागे केंद्र सरकारचा हेतू काय; राज ठाकरेंची टीका