राहुल गांधी यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात; गाड्यांचा चक्काचूर…

Rahul-Gandhi
Share

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशमधील पूर्वांचल एक्सप्रेसवेवर काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या सुरक्षा ताफ्याला अपघात झाला आहे. राहुल गांधी यांच्या ताफ्यात असणाऱ्या काही गाड्या एकमेकांवर आदळल्यामुळे हा अपघात घडला. या अपघातात ताफ्यातील वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, दोन जण जखमी झाले आहेत. सुदैवाने, या अपघातात राहुल गांधी पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांच्या सुरक्षा ताफ्यातील वाहने वेगाने जात असताना अचानक ब्रेक लावल्यामुळे मागून येणारी वाहने एकमेकांवर आदळली. या अपघातात वाहनांचे नुकसान झाले असून, प्राथमिक माहितीनुसार एक-दोन व्यक्तींना किरकोळ दुखापत झाली आहे. राहुल गांधी सुरक्षित आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

घटनेची माहिती मिळताच स्थानिक हलियापूर पोलीस आणि सुरक्षा दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले. जखमींवर प्रथमोपचार करण्यात आले. प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांनी परिस्थिती हाताळली आणि काही काळ विस्कळीत झालेली वाहतूक पुन्हा सुरळीत केली. सुदैवाने, आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे.

मोदींची योजना, शाह यांची अंमलबजावणी आणि ज्ञानेश कुमार यांची मतचोरीची कार्यवाही – राहुल गांधी

सरकारमधील विद्यमान २०० अधिकारी काँग्रेसला अंतर्गत माहिती देतात – राहुल गांधी यांचा दावा

मतं चोरणाऱ्यांना आज ना उद्या शिक्षा करणारच : राहुल गांधी

One thought on “राहुल गांधी यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात; गाड्यांचा चक्काचूर…”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!