प्रकाश आंबेडकर यांचे वादग्रस्त वक्तव्य; शेतकरीच नालायक आहेत…

prakash-ambedkar
Share

मुंबई : राज्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती आणि शेतकऱ्यांचे जीवन संपवण्याच्या मुद्द्यांवरून वातावरण तापलेले असतानाच वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी एक वादग्रस्त आणि धक्कादायक वक्तव्य केलं आहे. जे लोक स्वतःचं जीवन संपवतात त्यांच्या कुटुंबीयांना भेटायला कुठल्याही पुढाऱ्याने जाऊ नये, मरायचंच असेल तर 10-12 पुढाऱ्यांना मारा आणि मग मरा, असे खळबळजनक वक्तव्य त्यांनी केले आहे. शेतकरी नालायक आहे, त्यांच्यासाठी लढणाऱ्यांना तो मतं देत नाही, असेही आंबेडकर म्हणाले. प्रकाश आंबेडकर हे बुलढाण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधत होते.

बुलढाण्यामध्ये माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “शेतकरीच नालायक आहेत, त्याला काय करणार? शेतकऱ्यांसाठी जो नेता प्रामाणिकपणे लढतो त्याला ते मतं देत नाहीत. बुलढाण्यामध्ये रविकांत तुपकर शेतकऱ्यांसाठी लढतात, पण शेतकरी दुसऱ्यालाच निवडून आणतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता स्वतःच्या तोंडात मारून घ्यायला पाहिजे. अल निनो येणार हे गेल्या वर्षीपासून माहिती असूनही शासनाने अन्नधान्य, पाणी आणि चाऱ्याचे काहीही नियोजन केले नाही. अस्मानी संकटाला तोंड कसे द्यायचे याचा कोणताही आराखडा सरकारकडे तयार नाही. जर सरकारने अन्नधान्य आणि चारा पुरवला नाही, तर नागरिकांनी मंत्री, आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांच्या घरासमोर लाईन लावली पाहिजे. राज्यात एका बाजूला पाऊस पडत नाही आणि दुसऱ्या बाजूला पर्यावरण नष्ट केले जात आहे, त्यामुळे लोकांनी आता कायदा हातात घ्यायला शिकलं पाहिजे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

दरम्यान, अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील भ्रष्टाचारावर बोट ठेवताना प्रकाश आंबेडकरांनी गंभीर आरोप केले. अमरावती शिक्षक मतदार संघात पाचही उमेदवारांनी प्रत्येक मतासाठी 5-5 हजार रुपये खर्च केले. 30 हजार मतांच्या हिशोबाने उमेदवारांनी तब्बल 15 कोटी रुपये खर्च केले असा आरोप त्यांनी केला. हे 15 कोटी रुपये आले कुठून? यांच्यामागे इन्कम टॅक्स किंवा ईडी लागणार आहे का नाही? असा प्रश्न त्यांनी विचारला. तसेच या निवडणुकीनंतर विद् आता शिक्षकाला ‘मास्तर’ म्हणण्याऐवजी ‘5000’ आणि शिक्षिकेला ‘पैठणी’ म्हटले पाहिजे, असा सणसणीत टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे.

राज ठाकरे यांच्याकडून अखेर ‘ती’ डॉक्युमेंटरी डिलीट, सांगितले खरे कारण…

बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ; पोलिसांनी धाडली नोटीस…

मोठा आरोप! शर्टच्या खिशाला पेन, कमळाचं बटण दाबून बाहेर आल्यावर पैसे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!