अजितदादा विमान अपघाताला नवं वळण; रोहित पवार यांचा खळबळजनक दावा…

ajit-pawar-plane-crash
Share

मुंबईः राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामतीजवळ अपघात झाला. यात अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना उघडकीस येताच एकच खळबळ उडाली. मात्र आता या अपघाताबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे मागील काही दिवसांपासून सातत्याने अजित पवार विमान अपघाताबाबत विविध प्रश्न उपस्थित करत आहेत. अजित दादांच्या विमानाला अपघात झाला असून हा घातपाताचा प्रकार आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. या कटात व्हीएसआर कंपनी आणि काही राजकीय नेत्याचा सहभाग असल्याचा संशय त्यांनी यापूर्वी व्यक्त केला आहे. तसेच याबाबत सीआयडीकडून योग्य प्रकारे तपास केला जात नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

रोहित पवार यांनी खळबळजनक दावा केला आहे. ज्या विमानात अजित पवारांचा अपघात झाला. त्या विमानाच्या ब्लॅकबॉक्समध्ये व्हीएसआर कंपनीचा मालक व्ही के सिंग छेडछाड करत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. ब्लॅकबॉक्समधील संवेदनशील माहिती एडीट केली जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. एक्स अकाऊंटवर पोस्ट लिहून त्यांनी याबाबतचा आरोप केला.

एक्स अकाऊंटवर केलेल्या पोस्टमध्ये रोहित पवार म्हणाले, “फेरफार करण्यात अत्यंत सराईत असलेला VSR कंपनीचा मालक व्ही. के. सिंग सद्यस्थितीला आपल्या मर्जीतील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून FDR (balckbox चा एक भाग ज्यामध्ये विमानांची सर्व तांत्रिक माहिती रेकॉर्ड झालेली असते) मधील एडिट करत असल्याची माहिती मिळाली आहे.”

“DGCA किंवा AAIB मधील जे कुणी यासाठी मदत करत असतील किंवा करणार असतील त्यांनी फॉरेन्सिक ऑडीटमध्ये हा फेरफार पकडला जाईल, याची नोंद असू द्यावी. उद्या आम्ही संसदेच्या माध्यमातून समिती स्थापन केल्यानंतर (जी होणारच आहे) आणि त्यात फॉरेन्सिक ऑडीट झाले, जे होणारच आहे, तेव्हा VSR कंपनीला वाचवायला कुणीही येणार नाही. तसंच DGCA मध्ये अनेक अधिकारी प्रामाणिक देखील आहेत, हेही लक्षात असू द्यावं,” असं रोहित पवारांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. रोहित पवार यांच्या पोस्टनंतर आता विविध चर्चांना उधाण आले आहे.

अजितदादा अपघात की घातपात! रोहित पवार यांनी घेतली दिल्लीत बड्या नेत्यांची भेट…

अजितदादांच्या अपघातावर VSR कंपनीच्या मालकाचा धक्कादायक जबाब…

नवा राजकीय डाव! राष्ट्रवादी विलीनीकरणाला अडथळे; रोहित पवारांचा दिल्ली दौरा काँग्रेसकडे

पोलिसांच्या गाडीतून पाहुण्याप्रमाणे त्याची पाठवणी केली: रोहित पवार

अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाला आता मोठे वळण…

अजित पवार यांच्या घातपाताचा संशय! राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग…

रोहित पवार यांच्याकडून विमान अपघात अहवालाची चिरफाड; विमानाची रेकी…

अजित पवार यांच्या विमान अपघाताचा पहिला अहवाल समोर; धक्कादायक माहिती…

अजितदादांना जाऊन एक महिना झाला, रोहित पवार यांची हृदयद्रावक पोस्ट…

अजितदादांसाठी रोहित पवार, युगेंद्र पवार बारामती पोलिस ठाण्यात जाणार; मुंबईत नाही घेतली FIR…

अजित काकांसाठी आम्ही लढत राहू, मराठी माणूस दाखवून देऊ: रोहित पवार

अजितदादा विमान अपघात प्रकरण! रोहित पवार यांचा दिल्लीत नवा गौप्यस्फोट…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *