मुंबई: ठाण्यातले एसआयटी कोणाच्या अंडर आहे? ठाण्यातले 90% अधिकारी, पोलिस अधिकारी हे पालकमंत्र्यांच्या पगारावर जातायत. सरकारचे नोकर नाहीयेत, ते पालकमंत्र्यांचे आहेत. जर ते नसते, तर पूर्णेकरांच्या खून प्रकरणामध्ये ऐव्हाना शिंदे पती-पत्नी हे तुरुंगात असते, असे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
ठाकरे गटाचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला 27 दिवस उलटल्यानंतरही या कटाच्या सूत्रधारांना अटक न झाल्यामुळे राम पूर्णेकर यांनी मंगळवारी (ता 27) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या शुभ-दीप या निवासस्थानाबाहेर ठिय्या देण्यापूर्वीच ठाणे पोलिसांनी राम पूर्णेकर यांना ताब्यात घेतले.
View this post on Instagram
पोलिसांकडून ताब्यात घेतले जात असताना राम पूर्णेकर यांच्या भावनांचा बांध फुटला आणि त्यांना रडू कोसळले. तेव्हा पोलिसांनी रडणाऱ्या राम पूर्णेकर यांची कशीबशी समजूत काढत त्यांना रिक्षात कोंबून ताब्यात घेतले आणि पोलिस ठाण्यात नेले. राम पूर्णेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील शुभ – दिप निवासस्थानाबाहेर आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, या ठिय्या आंदोलनापूर्वीच वागळे इस्टेट पोलिसांनी राम पूर्णेकर यांना ताब्यात घेतले. या प्रकरणानंतर आज माध्यमांशी बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त करत पोलिसांना इशारा दिला आहे.
संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले, मराठवाड्यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सावकारी पाशामध्ये शेतकरी अडकलेला आहे. ज्या फायनान्स कंपन्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांना टॉर्चर करतायत. मुख्यमंत्री फक्त तिकडे बसून आदेश देतायत. असं करणाऱ्यांवरती फौजदारी गुन्हे दाखल करा वगैरे वगैरे वगैरे. पण ठाण्यामध्ये राजेंद्र शिंदे आणि मीनाक्षी शिंदेला अटक करा असे आदेश ते देत नाहीत. प्रदीप पूर्णेकरांच्या खऱ्या हत्यारांना पकडा, खुन्यांना पकडा, यासाठी कालपासून शेकडो ठाणेकर रस्त्यावर आहेत. उद्या आदित्य ठाकरे, मी स्वतः अनिल परब आणि मुंबईतून असंख्य शिवसैनिक तिकडे जाऊ. मुख्यमंत्र्यांनी आदेश द्यावा. मीनाक्षी शिंदे किंवा राजेंद्र शिंदे यांच्याबाबतचे ठोस पुरावे राम पूर्णेकर या प्रदीप पूर्णेकरांच्या चिरंजीवानं समोर आणलेले आहेत. की हत्येपूर्वी या सगळ्या आरोपींबरोबर राजेंद्र शिंदे दिसतायत, त्यांना मार्गदर्शन करतायत. हा जर पुरावा दुसऱ्या कोणाच्या बाबतीत असता, एवढ्याला त्या आरोपीला अटक करून मकोका लावला असता. ठाण्याचे पोलिस कोणाच्या दबावाखाली आहेत आणि एसआयटी स्थापन कसली करताय, आतापर्यंत किती खुनामध्ये एसआयटी स्थापन झाली? एसआयटी काय करणार आहे? ठाण्यातलं पोलिस दल पूर्ण बरखास्त व्हायला पाहिजे. जे शिंद्यांचे मिंधे आहे, पोलिस आयुक्तांपासून सगळे बरखास्त व्हायला पाहिजेत आणि आमची आता हीच मागणी राहील, जर या मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदेला अटक झाली नाही, तर ठाण्यातल्या बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी ही ठाण्याच्या पोलिस आयुक्तांवरच राहील. आम्ही शिंदे-बिंदेंना ओळखत नाही.’
एक तरुण मुलगा ज्याने आपला बाप गमावलाय. हत्या झाली नजरेसमोर. तो मुलगा न्याय मागण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यासमोर जर जात असेल, तर पोलिसांना चोंबडेपणा करण्याची गरज काय? पोलिसांना हा चोंबडेपणा करण्याची गरज काय? त्या मुलाचा अधिकार आहे, की जो पालकमंत्री आहे ठाण्यात, त्याच्या घरासमोर जाऊन न्याय मागणं ही परंपरा आहे. पोलिसांना कुणी सांगितलं जाऊन त्याला अटक करा म्हणून, त्यांनी काय त्याच्या हातात शस्त्र होतं? तो त्यांच्या घरात घुसणार होता? तो काय त्यांना शिवीगाळ करत होता? तो दारू प्यायला होता? तो ज्यांच्याकडे न्याय मागायला चालला होता ना, पोलिस कोणाचे नोकर आहेत ठाण्यामधले? ठाण्यातल्या पोलिसांना जे आता आहेत, जे चाकरी करतायत पालकमंत्र्यांची, त्यांना याची फार मोठी किंमत चुककावी लागेल. तुम्ही सर्विसमध्ये असा अगर नसा, तुम्हाला किंमत चुकावी लागेल, तुम्ही एक खून दडपण्याचा प्रयत्न करताय आणि ज्यांनी खून केला त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करताय, हे अमानुष आणि बेकायदेशीर आहे, अशा शब्दांत राऊतांनी पोलिसांना इशारा दिला आहे.
प्रत्येक एसआयटी महाराष्ट्रात नेमलेली ही बुळचट आहे. जेव्हा मी नाव पाहत होतो त्यातली, हे नकार घंटा वाजवणारे अधिकारी, हे जे बलकवडे आहेत, मला त्यांच्याशी व्यक्तिगत काही म्हणायचं नाही. पण एकनाथ शिंदे यांच्या दरे गावाजवळ जो ड्रगचा कारखाना पकडला, तेव्हा ते तिथे ड्युटीवरती होते, काय केलं त्यांनी, कोणाला अटक केलं? शेकडो कोटींचं ड्रग सापडतंय उपमुख्यमंत्र्यांच्या दारात, शेतात आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भावाचं नाव त्यात येतं, साधं चौकशीला तरी बोलवलं आणि हे एसआयटीचे प्रमुख आहेत. हे एसआयटीचे प्रमुख आहेत ऑडिओ क्लिप प्रकरणामध्ये. ठाण्यातले एसआयटी कोणाच्या अंडर आहे? ठाण्यातले 90% अधिकारी, पोलिस अधिकारी हे पालकमंत्र्यांच्या पगारावर जातायत. सरकारचे नोकर नाहीयेत, ते पालकमंत्र्यांचे आहेत. जर ते नसते, तर पूर्णेकरांच्या खून प्रकरणामध्ये ऐव्हाना शिंदे पती-पत्नी हे तुरुंगात असते, असेही पुढे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
ज्ञानेश कुमार यांच्या हुकूमशाहीविरुद्ध निवडणूक आयोगातच बंड; संजय राऊत यांचा दावा
संजय राऊतांची पंतप्रधानांवर बोचरी टीका; अवदसा तुम्हाला आठवते तरी कशी, भ्रमिष्ट झालेत…