संजय राऊतांची पंतप्रधानांवर बोचरी टीका; अवदसा तुम्हाला आठवते तरी कशी, भ्रमिष्ट झालेत…

sanjay-raut
Share

मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करण्यास सुरुवात केली आहे. काल शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये त्यांनी जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनादरम्यान काही विद्यार्थ्यांकडून शिवीगाळ झाल्याचा उल्लेख केला. मात्र, “मुलांना माफ करायचं आहे. देश पुढे जात आहे, मुलांनीही पुढे यावं, त्यांच्यासोबत काम करू,” असेही मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदी यांच्या या वक्तव्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.

पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले, “हे कोण माफ करणारे? ही त्यांची आणखी एक शरणागती आहे. मुळात मुलांनी त्यांच्याकडे माफी मागितलेली नाही. आम्ही कोणी तुमच्याकडे माफी मागितली आहे का? ही अवदसा तुम्हाला आठवते तरी कशी? हे भ्रमिष्ट झालेले आहेत. या देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हे मनाने आणि विचाराने भरकटलेले आहेत. त्यांनी त्यांचे सल्लागार बदलायला पाहिजेत. तुम्ही माफ करताय, तर मग शेकडो मुलांचे चारित्र्य कशाला तपासत आहात? आता चंद्रकांतदादा पाटील दगडाचे ठसे घ्यायला गेलेले आहेत. त्यांनी तिथे कोरीव काम सुरू केले. मला कोणीतरी सांगितलं, काल ते ट्रक घेऊन गेलेत. त्यांना अमित शाह यांनी जबाबदारी दिलेली आहे की, दगड गोळा करा. आता डॉ. अब्दुल कलाम हे मागे पडलेले आहेत. डॉ. अब्दुल कलाम यांना आता लोक विसरतील. यापुढे डॉ. अब्दुल कलाम यांच्यानंतर चंद्रकांत पाटील यांना संशोधन व विज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च जागतिक पुरस्कार देणे गरजेचे आहे.’

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!

“पंतप्रधानांना मानसोपचारतज्ज्ञाची गरज आहे. आपण कोणालातरी जर्सी गाय म्हणाला होतात. आपण कोणालातरी पन्नास कोटींची गर्लफ्रेंड म्हणाला होतात. तुमच्या अंगावर आल्यावर तुम्ही दुसऱ्यांची आई-बहीण काढली होती, हे विसरत आहात का? कोणीही तुमच्या आई-बहीणीवर गेलेले नाही. तो भावनांचा उद्रेक होता. ज्या पद्धतीने हा देश चालवला जात आहे, त्याला हुकूमशाही म्हणतात. त्या हुकूमशाहीविरोधात जर पोरं रस्त्यावर आली असतील, आणि याच मुलांच्या मदतीने तुम्ही 2014 साली सत्तेवर आला होतात. राज्यकर्त्याला त्याच्या लायकीनुसार प्रेम, आधार आणि शिव्या मिळत असतात,” असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर असल्याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले, “अमित शाह एकदाही संसदेच्या सभागृहात आले नाहीत आणि हे बाहेर पुण्यात भटकत आहेत. हे लोकशाहीचे दुर्दैव आहे. तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात. संसदेमध्ये अँटी पेपर लीक विधेयकावर चर्चा सुरू आहे आणि पेपरफुटीच्या अपराधाला देशाचे गृहमंत्रालय जबाबदार आहे. मुलांच्या भविष्याचे रक्षण तुम्ही करू शकला नाही. उलट विद्यार्थी रस्त्यावर न्याय मागायला उतरले, तेव्हा तुम्ही त्यांच्यावर अश्रुधूर सोडला, खिळे लावलेल्या लाठ्या चालवल्या, पॅलेट गन चालवल्या, म्हणजे गोळीबार केला. जेव्हा या विषयावर चर्चा झाली, तेव्हा अमित शाह हे संसदेतून पळून गेले. एकतर हे त्यांचे नैतिक अधःपतन आहेच आणि डरपोकपणाचा कळस आहे,” असे म्हणत त्यांनी अमित शाह यांच्यावर राऊत यांनी हल्लाबोल केला.

गद्दारांना कोणतीही भूमिका नसते; ओम निंबाळकर हे नामचिन गद्दार : संजय राऊत

…आता आमचे ऑपरेशन तुडवा सुरू होणार : संजय राऊत

Gen Z हा शब्द मला काही कळला नाही : इंदुरीकर महाराज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *