नगरमध्ये ग्रामपंचायतीच्या कार्यालयात महिलेचा प्रेमसंबंधातून खून…

gram-panchayat
Share

अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील भिंगार परिसरातील वडारवाडी ग्रामपंचायत कार्यालयात एका महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. चाकू आणि लोखंडी रॉडने हल्ला करत हा खून करण्यात आला आहे. ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी संशयित आरोपीला ताब्यात घेतलं आहे. ग्रामपंचायतीच्या कार्यालयातच अशाप्रकारे महिलेची हत्या केल्याने गावात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

मृत महिला (वय ४२) ग्रामपंचायत कार्यालयात सफाई कामगार म्हणून कार्यरत होत्या. तर संतोष नाना धोत्रे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अनैतिक प्रेमसंबंधातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

मिळालेल्या माहितीनुसार, आज (मंगळवार) सकाळी साडेसातच्या सुमारास वडारवाडी ग्रामपंचायत कार्यालयात ही खळबळजनक घटना घडली. सकाळी कार्यालय सुरू असताना संशयित आरोपी संतोष नाना धोत्रे (वय ४९) याने अचानक महिलेवर चाकू आणि लोखंडी रॉडने हल्ला केला. डोक्यावर आणि गळ्यावर गंभीर वार झाल्यामुळे महिलेचा जागीच मृत्यू झाला. शासकीय कार्यालयातच एका महिलेची अशा प्रकारे हत्या झाल्याचे समजताच वडारवाडीसह संपूर्ण भिंगार परिसरात मोठी सनसनाटी पसरली. घटनेची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे पथक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी अहिल्यानगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.

दरम्यान, तपासादरम्यान या हत्येमागील धक्कादायक कारण समोर आले आहे. मृत महिला आणि आरोपी संतोष धोत्रे यांच्यात गेल्या १० वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याची माहिती पुढे आली. आरोपी संतोष हा त्याच्या पत्नीपासून वेगळा राहत असून, त्यांच्यात न्यायालयात घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे. दुसरीकडे, मृत महिलेचा पती हयात नाही. दरम्यान, प्रमिला यांची अन्य एका व्यक्तीशी जवळीक वाढल्याचा आणि त्यांच्यात प्रेमसंबंध असल्याचा संशय संतोष धोत्रे याला आला होता. याच विकृत संशयातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलत प्राणघातक हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्परता दाखवत संशयित आरोपी संतोष धोत्रे याला तत्काळ आपल्या ताब्यात घेतलं. त्याची पोलीस कसून चौकशी करत आहेत.

बड्या नेत्याच्या बायकोचं लग्नानंतरही प्रेमसंबंध; बेडरूममध्ये पाहिले तर…

राजकीय नेत्याने लग्नाचे आमिष दाखवून ठेवले शारीरिक संबंध अन्…

मनसे नेत्याचं महिलेसोबत अश्लील वर्तन, गुन्हा दाखल…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!