कोल्हापूर: एका मनसेच्या नेत्याने महिला अधिकाऱ्यासोबत अश्लील कृत्य केले आहे. संबंधित नेत्याने महिलेच्या कार्यालयात जाऊन तिला धमकावले. शिवाय अश्लील शब्दात तिला शिवीगाळ करत मारहाण करण्याची देखील धमकी दिली. या प्रकरणी मनसेच्या नेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रसाद पाटील असे गुन्हा दाखल झालेल्या मनसेच्या नेत्याचे नाव आहे. ते मनसेचे कोल्हापूरचे शहराध्यक्ष आहेत. त्यांच्यासह अभिजीत पाटील आणि इतर दोन ते तीन जणांविरोधात देखील गुन्हा दाखल केला आहे. एका राजकीय नेत्यानं सरकारी कार्यालयात जाऊन अशाप्रकारे महिलेचा विनयभंग केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
प्रसाद पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे माहिती अधिकार अधिनियमाअंतर्गत काही माहिती मागवली होती. ही माहिती देऊनही पाटील यांनी महिला अधिकाऱ्याशी वाद घातला. ही माहिती देण्यासाठी ३० दिवसांचा कालावधी विहीत आहे. असे असताना देखील ती माहिती आत्ताच दे, असे म्हणत एकेरी भाषा वापरल्याचा प्रसाद पाटील यांच्यावर आरोप आहे. शिवाय फोनवरून बोलताना संबंधित महिलेचा उल्लेख छमीया केल्याचे देखील तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
कार्यालात जाऊन धिंगाणा घालणे, अपशब्द वापरून मोठ्याने बोलणे, शासकीय वेळ संपल्यानंतर सुद्धा रात्री उशिरापर्यंत थांबवून माहिती देण्यास भाग पाडणे. तसेच त्या महिला अधिकारी आहे म्हणून वाचल्या, पुरूष असता तर त्याला कपडे फाडून बाहेर नेऊन मारला असता अशा प्रकारचे अपशब्द वापरल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी प्रसाद पाटील यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.