पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसीमध्ये भाजपला मोठा धक्का…

Share

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधान परिषदेच्या (MLC) शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्ये समाजवादी पक्षाने (SP) जोरदार मुसंडी मारली आहे. वाराणसी शिक्षक मतदारसंघातून सपाचे उमेदवार लाल बिहारी यादव यांनी भाजपच्या डॉ. प्रमोद मिश्रा यांचा 5,015 मतांनी पराभव करत विजय मिळवला आहे.

पंतप्रधानांच्या बालेकिल्ल्यात मिळालेल्या या मोठ्या विजयानंतर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भारतीय जनता पक्षावर (BJP) अत्यंत खोचक शब्दांत टोलेबाजी केली आहे. त्यांनी लिहिले की, “वाराणसीतील विधान परिषदेच्या निवडणुकीतील पराभवामुळे निराश झालेल्या भाजपची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. परिस्थिती अशी आहे की लखनऊमधील नेते हे दिल्लीतील नेत्यांचे फोनही उचलत नाहीत. खरे तर भाजप यूपी विधान परिषदेच्या निवडणुकीत पूर्णपणे ऑल आऊट झाला आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

“वाराणसीत मतमोजणी थांबवून निकाल बदलण्याची जुनीच युक्ती वापरली जात आहे. पराभवाच्या भीतीमुळे कोणीतरी इकडे-तिकडे फेऱ्या मारत असल्याचे ऐकायला मिळत आहे. वाराणसीत मतमोजणी थांबवणे किंवा ती संथ गतीने करण्यामागील कारस्थान सर्वांना समजते आहे, परंतु भाजप यामध्ये कधीही यशस्वी होणार नाही. भाजपचा वाराणसीतील पराभव राष्ट्रीय बातमी बनू नये, यासाठीच हा सर्व कट रचला जात आहे. निकाल तयार असूनही विजयाचे प्रमाणपत्र दिले जात नाही.”

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत अखिलेश म्हणाले, “निवडणूक आयोगाकडे आपली निष्पक्षता सिद्ध करण्याची ही शेवटची संधी आहे. जर ते निष्पक्ष राहू शकत नसतील तर त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, कारण ते पारदर्शक मतमोजणी करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. भाजपला जर प्रामाणिकपणे जिंकायचे कसे हे माहीत नसेल, तर त्यांनी किमान प्रामाणिकपणे पराभव स्वीकारायला तरी शिकावे.”

दरम्यान, वाराणसी शिक्षक मतदारसंघात सपाचे लाल बिहारी यादव यांनी भाजप समर्थित उमेदवार प्रमोद मिश्रा यांचा 5,015 मतांच्या फरकाने पराभव केला आहे. या विजयामुळे सपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, 2027 च्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून हा निकाल अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

विधान परिषदेच्या ५ जागांचा निकाल जाहीर; पाहा विजयी उमेदवारांची नावे…

मी आतुरतेने वाट पाहतोय, महाराष्ट्र माझ्या हातात सत्ता कधी देतोय: राज ठाकरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!