ऑपरेशन टायगर! शिंदे गटाच्या वाटेवर असण्याची शक्यता असणाऱ्या खासदारांची पाहा नावे…

eknath-shinde
Share

मुंबईः एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ‘ऑपरेशन टायगर’ आता अंतिम टप्प्यात आले आहे. गेल्या काही तासांपासून दिल्लीत ‘ऑपरेशन टायगर’ची (Opeartion Tiger) अंमलबजावणी सुरु आहे. ठाकरे गटाचे पाच किंवा सहा खासदार (Shivsena MPs) लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांना भेटून आपण शिंदे गटाला पाठिंबा देत असल्याचे पत्र सादर करतील.

ठाकरे गटाचे एकूण नऊ खासदार आहेत. त्यापैकी 5- 6 खासदार फुटल्यास पक्षांतरबंदी कायद्यानुसार दोन तृतीयांश संख्याबळाच्या अटीची पूर्तता होत असल्याने हे खासदार स्वतंत्र गट स्थापन करु शकतील. उद्धव ठाकरे यांनी या खासदारांना आपल्याकडे ठेवण्यासाठी बरेच प्रयत्न केले. मात्र, एकनाथ शिंदे यांचे सत्तेत असणे आणि त्यांनी दिलेली आश्वासनं वरचढ ठरल्यामुळे ठाकरे गटाचे सहा खासदार अखेर शिंदे गटात जाण्यास राजी झाल्याचे माहिती पुढे आली आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!

एकनाथ शिंदे यांच्याकडून ठाकरे गटाच्या खासदारांना अनेक मोठी आश्वासनं देण्यात आली आहेत. शिवाय, आगामी काळात मुबलक निधी देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी या सर्व सहा खासदारांना 2029 च्या लोकसभा निवडणुकीत तुम्हाला निवडून आणेन, असा शब्द दिल्याने हे खासदार उद्धव ठाकरे यांची साथ सोडायला तयार झाल्याचे समजते.

ठाकरे यांच्या नऊ खासदारांची नावे…
1. अनिल देसाई
2. अरविंद सावंत
3. संजय दिना पाटील
4. राजाभाऊ वाजे
5. संजय जाधव
6. संजय देशमुख
7. नागेश पाटील आष्टीकर
8. ओमराजे निंबाळकर
9. भाऊसाहेब वाकचौरे

शिंदे गटाच्या वाटेवर असण्याची शक्यता असणारे खासदार…
1. संजय जाधव
2. संजय देशमुख
3. नागेश पाटील आष्टीकर
4. ओमराजे निंबाळकर
5. भाऊसाहेब वाकचौरे
6. संजय दिना पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *