महागाईचा भडका! व्यावसायिकसह घरगुती सिलेंडरच्या किंमतीमध्ये झाली मोठी वाढ…

gas-cylinder
Share

मुंबई : घरगुती गॅसच्या किंमतींमध्ये गेल्या १५ वर्षांत मोठी वाढ झाली आहे. महागाईचा सामना करणाऱ्या सर्वसामान्यांना आता पुन्हा गॅस दरवाढीचा फटका बसण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात ६० रुपयांनी दरवाढ झाल्यानंतर आता आणखी वाढ होण्याची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, १ मे रोजी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशावर ताण वाढला आहे.

१ मे रोजी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ करण्यात आली. या अचानक झालेल्या दरवाढीमुळे हॉटेल आणि खानावळींचे दर वाढण्याची शक्यता आहे. परिणामी, बाहेर जेवण करणे महागले असून नोकरदार आणि विद्यार्थ्यांच्या खर्चात मोठी वाढ होणार आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात ४० ते ५० रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते. आधीच सिलेंडरचे दर १००० रुपयांच्या जवळपास पोहोचले आहेत. अशा परिस्थितीत आणखी वाढ झाल्यास सर्वसामांना महागाईचा फटका बसणार असून, आर्थिक बजेट कोलमडण्याची शक्यता आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!

दरम्यान, जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने चढउतार होत आहेत. याचा परिणाम स्थानिक इंधन दरांवर होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत सरकारने कर आणि उपकर कमी करून महागाईचा थेट फटका कमी ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता जागतिक स्तरावर किंमती वाढत असल्याने पेट्रोल-डिझेल आणि गॅस दरवाढीची शक्यता वाढली आहे.

महागाईचा झटका! CNG महागला, घरगुती गॅसचं काय? पाहा नवीन दर…

Video! पाकिस्तानमध्ये इंधन दरवाढीने नागरिकांचा संताप; पेट्रोल 458 तर डिझेल 520 रुपये…

केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क केलं कमी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *