नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांनी आज (गुरुवार) राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेतली. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. या सोहळ्याला महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह जे. पी. नड्डा आणि जयराम रमेश यांसारख्या दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती.
शपथविधी सोहळ्यात पार्थ पवार यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विशेष ओळख असलेले ‘गुलाबी जॅकेट’ परिधान केले होते. अजितदादांच्या शैलीतील हा पेहराव पाहून उपस्थित अनेक नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या भावना दाटून आल्या. केवळ पेहरावच नाही, तर पार्थ पवारांची देहबोली आणि आवाजातही काही प्रमाणात अजितदादांची छटा जाणवत असल्याची चर्चा यावेळी रंगली.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
अजित पवार यांच्या आठवणींवर स्मरणग्रंथ होणार प्रकाशित; अनुभव व लेख पाठविण्याचे आवाहन…
दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंबावर आणि पक्षावर मोठी जबाबदारी आली आहे. अशा वेळी पार्थ पवारांची ही नवी इनिंग राष्ट्रवादी काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. महाराष्ट्रातील इतर खासदारांचा शपथविधी आधीच पार पडला होता, मात्र पार्थ पवारांच्या शपथविधीबाबत सस्पेन्स कायम होता. पार्थ पवार यांनी आज राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.
अजितदादांच्या निधनानंतर राज्याच्या विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या पक्षाची धुरा सांभाळत आहेत. आता संसदेत पार्थ पवार यांची उपस्थिती राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठी भूमिका बजावू शकते. पार्थ पवार यांनी यापूर्वी मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर राजकारणापासून ते अलिप्त होते. दिवंगत अजित पवार यांनी शरद पवार यांच्याशी फारकत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडल्यानंतर पार्थ पवार हे त्यांच्यासोबत अधिक सक्रिय झाल्याचे दिसून आले. त्यामुळे आता अजितदादांच्या पश्चात त्यांची नवी इनिंग सुरू होत आहे.
Watch | Rajya Sabha Chairman C. P. Radhakrishnan administered the oath to Parth Ajit Pawar, the newly elected NCP member from Maharashtra, in the Chairman’s Conference Room of the Parliament House.@VPIndia | @parthajitpawar | #RajyaSabha | #CPRadhakrishnan | #ParthAjitPawar |… pic.twitter.com/oXt2x1qwYE
— United News of India (@uniindianews) April 9, 2026
अजित पवारांनंतर पवार घराण्याची पुढील पिढी मैदानात; पार्थ पवारांना राज्यसभेची संधी
पार्थ पवार यांच्या सख्ख्या भावाचे परदेशात लग्न अन् दुसरीकडे अटकेची टांगती तलवार…
पार्थ पवार यांना अडकवणारा अजित पवार गटाचा नेता कोण? थेट नावच घेतले…