पार्थ पवार प्रकरण! थोरल्याच्या प्रतापाने धाकट्यावर अन्याय…

parth-ajit-pawar
Share

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जय पवार हे बारामती नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नसणार हे आज स्पष्ट केले आहे. यामुळे पार्थ पवार यांचे जमीन प्रकरणामुळेच जय पवार यांची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी हुकली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बारामती नगराध्यक्ष पदासाठी जय पवार उमेदवार असतील अशी चर्चा मागच्या आठवड्यात होती. मात्र, पार्थ पवार यांचे प्रकरण पुढं आलं आणि जय पवार यांची संधी हुकली का असा सवाल विचारला जात आहे. जय पवार उपमुख्यमंत्री अजित पवारांचे धाकटे चिरंजीव, परंतु थोरल्याच्या प्रतापामुळे धाकट्यावरती अन्याय झालाय का? अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.

पार्थ पवार प्रकरणी आजोबा शरद पवार वगळता संपूर्ण कुटुंब पार्थ पवारांच्या पाठीशी उभा राहिले. आत्या सुप्रिया सुळे यांनी तर थेट पार्थ काही चूक करणार नाही असे म्हणत त्याची पाठराखणच केली. तर भाऊ रोहित पवार यांनी भाजपला प्रश्न विचारले. तर वडील म्हणून अजित पवार देखील पार्थ पवार यांच्या पाठीमागे आहेत. गेल्या महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतील एका जाहीर कार्यक्रमात पोरांना किती जरी कमावून ठेवलं तरी कमीच असतं असं वक्तव्य केलं होते. उपमुख्यमंत्री अजित पवारांना हे प्रकरण आगामी काळात उघडकीस येणार याची कुणकुण लागली होती का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

जय पवार यांच्या उमेदवारीवरून अजित पवार यांनी जरी त्याला पूर्णविराम दिला असला तरी आगामी काळात जर गटबाजीचे पेव फुटलं तर अचानक जय पवार यांचे नाव पुन्हा रिंगणात येऊ शकते अशी शक्यता नाकारता येत नाही.

आजोबा शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्याविरुद्ध पुकारला राजकीय एल्गार…

पुणे जमीन घोटाळा प्रकरणात ट्विस्ट, व्यवहार रद्दच होऊ शकत नाही…

पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी राहुल गांधी यांचा हल्लाबोल…

मोठी बातमी! पुण्यातील जमिनीचा व्यवहार रद्द, अजित पवार म्हणाले…

पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण! अजित पवार हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; राजीनाम्याची मागणी…

पार्थ पवार अडचणीत! आणखी एक कारनामा समोर, गुन्हा दाखल…

जमीन गैरव्यवहार प्रकरण! अजित पवार यांनी काढला पार्थच्या डोक्यावरचा हात…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *