मुंबईः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ अजित पवार हे संचालक असलेल्या Amadea Holdings LLP नावाच्या कंपनीने, 1804 कोटीची महार वतनाची जमीन 300 कोटींना विकत घेतली. शिवाय, त्यावरील 21 कोटींची स्टॅम्प ड्युटी देखील माफ करण्यात आली. या गैरव्यवहारानंतर अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधक आक्रमक झाले आहेत. आजोबा शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्याविरुद्ध राजकीय एल्गार पुकारला आहे.
शरद पवार म्हणाले, ‘पुणे शहरातील कोरेगाव पार्क जमीन घोटाळा हा एक गंभीर विषय आहे. चौकशी करून सत्य समाजासमोर ठेवलं पाहिजे. सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य हे वैयक्तिक वक्तव्य होते. सुप्रियाला तिचं स्वत:चं मत असू शकते. तिने खूप सौम्य भूमिका मांडली होती. सरकारने समिती स्थापन केली आहे. प्रशासकीय गोष्टी वेगळ्या आणि कौटुंबिक गोष्टी वेगळ्या आहेत. कोण तेजवानी याबद्दल मला माहिती देखील नाही पण त्यांना शोधून काढावे. पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल का झाला नाही, याबाबत देवेंद्र फडणवीसच सांगू शकतील.’
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाविकास आघाडीत सामील केलं जाणार का? असा सवाल शरद पवार यांना विचारल्यानंतर ते म्हणाले, मनसे संदर्भात माविआने एकत्र बसून निर्णय घ्यावा. मनसे आणि माविआने मतचोरीविरुद्ध मुंबईमध्ये भव्य रॅली काढली होती.
माझा पार्थवर विश्वास असून तो चुकीची गोष्ट करणार नाही. मुख्यमंत्री म्हणाले की, मी या प्रकरणाची चौकशी करणार आहे. रकार म्हणत आमची जमीन विकता येत नाही. तहसीलदार म्हणतात मी सही केली नाही. त्यामुळे नोंदणी झाली की नाही? नेमकं सरकार कोण चालवतं? आम्ही लोकशाहीवर विश्वास ठेवतो. माझ्या मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा होत्या. त्यांची पहिली टर्म चांगली होती, अच्छे को अच्छा बोलना चाहिए, पण आता मुख्यमंत्र्यांना झालंय काय? इतका गोंधळ का? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला होता.
पुणे जमीन घोटाळा प्रकरणात ट्विस्ट, व्यवहार रद्दच होऊ शकत नाही…
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी राहुल गांधी यांचा हल्लाबोल…
मोठी बातमी! पुण्यातील जमिनीचा व्यवहार रद्द, अजित पवार म्हणाले…
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण! अजित पवार हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; राजीनाम्याची मागणी…
पार्थ पवार अडचणीत! आणखी एक कारनामा समोर, गुन्हा दाखल…
जमीन गैरव्यवहार प्रकरण! अजित पवार यांनी काढला पार्थच्या डोक्यावरचा हात…