पुणे : पुणे शहरातील कोरेगाव पार्क येथील महार वतनाच्या जमीनीच्या गैरव्यवहार प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार अडचणीत सापडले आहेत. या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पार्थ पवार यांच्या कंपनीने हा सगळा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची घोषणा स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. त्याबाबतचे पत्र पार्थ पवारांची कंपनी अमेडियाकडून निबंधक कार्यालयाला पाठवले असले तरी या प्रकरणात ट्विस्ट निर्माण झाले आहे.
पार्थ पवार यांनी हा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय घेतला असला तरी हा व्यवहार रद्द होऊ शकणार नाही, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. याचं कारण म्हणजे पार्थ पवार यांनी जिच्याकडून ही जमीन खरेदी केली होती, ती शीतल तेजवाणी सध्या फरार आहे. आरोपी शीतल तेजवाणी आपल्या पतीसह देश सोडून गेल्याची चर्चा असून, पोलिस तिचा शोध घेत आहेत. शीतल तेजवानी गायब असल्यानं पार्थ पवारांचा वादग्रस्त जमीन व्यवहार रद्द होऊ शकत नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.
दुय्यम निबंधक कार्यालयात शीतल तेजवानी आणि अमेडिया कंपनीकडून दिग्विजय पाटिल यांना समक्ष हजर राहणं बंधनकारक आहे. अशा परिस्थितीत शीतल तेजवानी परदेशात गेली असेल तर ती जो पर्यंत समोर येण्याची वाट पहावी लागेल. शितल तेजवानी जोपर्यंत समोर येत नाही, तोपर्यंत ही सही होणार नाही आणि हा व्यवहारही रद्द होणार नाही. त्याचबरोबर पार्थ पवार यांना देखील काही अटींची पुर्तता करावी लागणार आहे, त्यातली पहिली, मुद्रांक शुल्क 21 कोटी रुपयांचा भरावा लागणार आहे. त्याचबरोबर सुरवातीला जमीन खरेदी व्यवहार केला त्यातील मुद्रांक शुल्क, त्यापुढे आणखी एक अट आहे, विजय कुंभार यांच्या म्हणण्यानुसार दीडशे ते पावणे दोनशे कोटी रुपयांचा नजराना त्यांना भरावा लागणार आहे, ही सगळी पूर्तता केल्यानंतर हा जमीन व्यवहार रद्द होणार आहे, त्याच वेळी पार्थ पवार यांची या प्रकरणातून मुक्तता होणार आहे.
संबंधित व्यवहार रद्द करण्यासाठी पुण्यातील बावधन परिसरातील दुय्यम निबंधक कार्यालयात शीतल तेजवाणी आणि अमेडिया कंपनीकडून दिग्विजय पाटिल यांना समक्ष हजर राहणं बंधनकारक आहे. शीतल तेजवाणी जोपर्यंत समोर येणार नाही. तो पर्यंत व्यवहार रद्द होणार नाही, त्यामुळे हा व्यवहार रद्द करण्यासाठी मधला मार्ग काय काढला जातो, ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी राहुल गांधी यांचा हल्लाबोल…
मोठी बातमी! पुण्यातील जमिनीचा व्यवहार रद्द, अजित पवार म्हणाले…
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण! अजित पवार हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; राजीनाम्याची मागणी…
पार्थ पवार अडचणीत! आणखी एक कारनामा समोर, गुन्हा दाखल…
जमीन गैरव्यवहार प्रकरण! अजित पवार यांनी काढला पार्थच्या डोक्यावरचा हात…