भाजपने लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला केलं स्वीकृत नगरसेवक…

Share

मुंबईः बदलापूरच्या शाळेत काही महिन्यांपूर्वी दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे याला भाजपने स्वीकृत नगरसेवकपद देऊ केले आहे. भाजपच्या या निर्णयामुळे प्रचंड वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

तुषार आपटे बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी आहेत. अक्षय शिंदे लैंगिक अत्याचार प्रकरणात पोलिसांच्या तपासानंतर शाळा व्यवस्थापनातील काही सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तुषार आपटे याला भाजपने स्वीकृत नगरसेवकपद दिल्याने बदलापूरसह राज्यभरात चर्चा रंगली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नगरपालिका निवडणुकीत तुषार आपटे याने भाजपचे नगरसेवक निवडून आणण्यात मोठी मदत केली. त्याचे बक्षीस म्हणून तुषार आपटे यांना स्वीकृत नगरसेवकपद देण्यात आल्याचे सांगितले जाते.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

दरम्यान, बदलापूरच्या शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्यानंतर राज्यभरात प्रचंड संतापाची लाट उसळली होती. बदलापूरमध्ये नागरिकांनी निदर्शने करुन रेल्वे वाहतूक रोखून धरली होती. संपूर्ण बदलापूर शहर बंद ठेवण्यात आले होते. लहान मुलींचे शोषण झाल्याचे प्रकरण उघडकीला येऊ नये म्हणून शाळा प्रशासनाने बरीच लपवाछपवी केल्याचे समोर आले होते. काही पोलीस अधिकाऱ्यांनी याप्रकरणात गुन्हा नोंदवून घेण्यास नकार दिला होता. अखेर हे प्रकरण तापल्यानंतर पोलिसांनी शाळेच्या संस्थाचालकांवर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा तथाकथित चकमकीत मृत्यू झाला होता. त्यावेळी तुषार आपटे हेदेखील बरेच दिवस फरार होते. 44 दिवसांनी ते पोलिसांच्या हाती लागले होते. त्यानंतर अवघ्या 48 तासांमध्ये तुषार आपटेला जामीन मिळाला होता.

राज्य सरकारने या गंभीर प्रकरणाची पुरेशी दखल न घेतल्याने संतप्त बदलापूरकरांनी 20 ऑगस्ट रोजी तब्बल 12 तास रेल रोको आंदोलन केले. या आंदोलनानंतर न्यायालयानेही सरकारच्या भूमिकेवर कठोर शब्दांत ताशेरे ओढले. यानंतर शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल, सचिव तुषार आपटे आणि मुख्याध्यापिका अर्चना आठवले यांना सहआरोपी करून पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. पण आता प्रकरणातील आरोपी असतानाही भाजपकडून तुषार आपटे यांची बदलापूर नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *