मुंबईः उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार हे पुण्यातील एका जमीन घोटाळा प्रकरणामुळे अडचणीत सापडले आहेत. कोंढवा परिसरातील सरकारी जमीन खरेदी केल्याच्या कारणातून पुण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. पार्थ पवार यांच्या कंपनीकडून या जमीनीचा व्यवहार रद्द केला आहे. मात्र अद्याप त्यांची या प्रकरणातून पूर्णपणे सुटका झाली नाही. त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार कायम आहे.
अजित पवार यांच्या निकटवर्तीय नेत्यानेच पार्थ पवार यांना या प्रकरणात अडकवल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराने एका कार्यक्रमात जाहीरपणे याबाबत वक्तव्य केले आहे. त्यांनी पार्थ पवारांना अडकवणाऱ्या नेत्याचं देखील नाव घेतले आहे. हा आरोप शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी केला आहे.
अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अजित पवार याचे पूत्र पार्थ पवार यांना जमीन खरेदी घोटाळा प्रकरणात गुंतवण्यात खासदार सुनील तटकरे यांचा हात असल्याचा आरोप महेंद्र दळवी यांनी केला आहे. सुनिल तटकरे हे अजित पवार यांच्या मुलाला बदनाम करत आहेत. सुनील तटकरे यांची वाटचाल भाजपच्या दिशेने सुरू असल्याचा विधान देखील आमदार दळवी यांनी केले आहे.
महेंद्र दळवी यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अजित पवार यांच्या पुत्राला अडकवण्यात त्यांच्याच जवळच्या नेत्याचा हात आहे का? यावरून आता विविध तर्क वितर्क लढवले जात आहेत.
अंजली दमानिया करणार मोठा गौप्यस्फोट; अजित पवार व्यवहार रद्द करणारे कोण…
पुणे जमीन घोटाळ्यातील 42 कोटी भरण्याबाबत नवी माहिती समोर…
पार्थ पवार जमिनीप्रकरणात अंजंली दमानिया करणार मोठा गौप्यस्फोट…
पुणे जमीन घोटाळ्यातील 42 कोटी भरण्याबाबत नवी माहिती समोर…
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण! अजित पवार हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; राजीनाम्याची मागणी…