चर्चांना उधाण! शरद पवार-सुप्रिया सुळे यांनी घेतली नरेंद्र मोदी यांची भेट…

sharad-pawar
Share

नवी दिल्ली: राजधानीत विद्यार्थी आंदोलन सुरू असताना ज्येष्ठ नेते शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीचं अधिकृत कारण समोर आलं नसून कोणत्या मुद्यावर चर्चा झाली याची माहिती गुलदस्त्यात आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

नीट पेपरफुटी प्रकरण आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत जंतरमंतरवर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. सोमवारी, पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्जदेखील केला. या लाठीमारानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. शरद पवार यांनी मंगळवारी जंतरमंतरवर जात अभिजीत दीपके आणि इतर आंदोलकांची भेट घेतली. तर, दुसरीकडे राजकीय वर्तुळात या भेटीच्या टायमिंगची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी एनडीएत जाणाार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. त्यातच सुप्रिया सुळे यांनी मतदारसंघ पुनर्रचनेच्या घटनादुरुस्तीच्या विधेयकाला सशर्त पाठिंबा देण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे पीएम मोदी-पवार भेटीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!

दरम्यान, विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस व विरोधी पक्षाच्या खासदारांनी पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थाना बाहेर धरणे आंदोलन केले. त्यानंतर रात्री राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव यांच्यासह अनेक नेत्यांना ताब्यात घेण्यात आले.

राहुल गांधी आणि काँग्रेसने केलेल्या या अचानक आंदोलनामुळे एकच खळबळ उडाली. पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर अचानक धरणे आंदोलन सुरू झाल्याने सुरक्षा यंत्रणांची तारांबळ उडाली. केंद्रीय मंत्र्यांनी राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा केली. मात्र, पीएम मोदी यांनी बाहेर येऊन चर्चा करावी असे राहुल गांधी यांनी म्हटले. अखेर रात्री पोलिसांनी राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना ताब्यात घेतले.

विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी राहुल गांधी, शरद पवार उतरले राजकीय मैदानात…

अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप; दिल्ली पोलिसांनी मुलींचे कपडे फाडले, छातीवर पाय दिला…

Video: कॉकरोच जनता पार्टीचा गंभीर आरोप; दगडांनी भरलेला डम्पर अन्…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *